ATS Karvai : अलिगढमधून ISIS च्या दोन दहशतवाद्यांना पकडले, ‘हा’ होता त्यांचा डाव

131

उत्तरप्रदेश एटीएसने (ATS Karvai) अलिगढमधून ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची टीमही या दोघांची चौकशी करणार आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी संघटनेचे विद्यार्थी आहेत.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नुकतेच जामिया मिलिया इस्लामियाचा पीएचडी विद्यार्थी अर्शद वारसी आणि पुणे इसिस प्रकरणातील राष्ट्रीय तपास संस्थेचा (एनआयए) वाँटेड दहशतवादी शाहनवाज यांना दिल्लीतून अटक केली होती.
एनआयए आणि दिल्ली स्पेशल सेलने अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांकडून अलीगढचे रहिवासी अब्दुल्ला अर्सलान आणि माझ बिन तारिक यांची माहिती मिळाली होती. त्यानंतर यूपी एटीएसने अलीगडमध्ये छापा टाकून दोघांनाही अटक केली.

(हेही वाचा : Kartiki Ekadashi : विठ्ठल महापूजेला मराठा आरक्षणाच्या वादाची किनार; दोन्ही उप मुख्यमंत्र्यांची कोंडी)

हे ISIS चे संपूर्ण भारतातील मॉड्यूल आहे ज्यामध्ये उत्तर प्रदेश, झारखंड, पुणे येथील शिक्षित विद्यार्थ्यांचा समावेश आहे.ATS ने ISIS या खतरनाक दहशतवादी संघटनेशी संबंधित अब्दुल्ला अर्सलान आणि माझ बिन तारिक या दोन दहशतवाद्यांना अलीगढ येथून अटक केली आहे. ते यूपीमध्ये मोठी दहशतवादी घटना घडवण्याची योजना आखत असल्याची माहिती आहे. दोघेही इसिसच्या पुणे मॉड्यूलशी संबंधित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.