अयोध्येतील श्री राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. त्याआधीच उत्तर प्रदेश एटीएसने मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (ISIS) च्या भारतात आपले तळ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लावला आहे. एटीएसने महाराष्ट्रातील ११ ठिकाणी छापे टाकून तेथून आयसिससंबंधी अनेक आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश एसटीएस महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचले. तेथे ISIS शी संबंधित संशयित लपलेल्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. यावेळी संशयितांच्या अड्ड्यातून फोन आणि लॅपटॉप, जिहादी साहित्य आदी साहित्य जप्त करण्यात आले. यानंतर, लखनऊ येथील यूपी एटीएस कार्यालयात येण्यासाठी त्यांच्या घरी नोटीस देऊन एटीएस पथक परतली.
वादग्रस्त पोस्टने खळबळ
वास्तविक, यूपी एटीएसने सोशल मीडियावर सद्दाम नावाच्या इसिस समर्थकाची पोस्ट पाहिली. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “संविधानात बदल करायचे असल्यास मुस्लिमांना जागे व्हावे लागेल. जिहाद माझ्या रक्तात आहे. त्यागाची भीती वाटणार नाही. निवडून आलेले सरकार मुस्लिमांवर अत्याचार करते. बाबरी मशिदीच्या निर्णयाचा मला राग आहे. बदला घेण्याची इच्छा. ओसामा बिन लादेन आणि बुरहान वानी हे माझे आदर्श आहेत.
(हेही वाचा Ashish Shelar : संजय राऊतांच्या टीकेवर आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले,’… तर भर चौकात होऊ शकता नागवे’)
संशयितांच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेशात हजर राहण्याची नोटीस
सद्दामच्या पोस्टची चौकशी केली असता संभाजीनगरमध्ये असे ११ संशयित सापडले. ते ISIS या दहशतवादी संघटनेशी वैचारिकदृष्ट्या जोडलेले आढळले. यानंतर UP ATS ने ३० डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे छापा टाकला. या सर्व आरोपींच्या कुटुंबीयांना १५ ते १८ जानेवारी दरम्यान लखनऊ येथील यूपी एटीएस कार्यालयात बोलावण्यात आले आहे. एटीएसने या कटात सहभागी असलेल्या मिर्झा सैफ बेग, अब्दुल वाहिद, यासिर, झियाउद्दीन सिद्दीकी, थोर भान, एसके खालिद, ताहिर उर्फ सर, सादिक हबीब यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हे संशयित घरातून अचानक गायब झाल्याची माहिती मिळताच एटीएसने तेथे जाऊन छापा टाकला. मात्र, कोणालाही अटक करण्यात आली नाही. काही संशयितांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यूपी एटीएसच्या छाप्यांमुळे महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. यूपी एटीएसचा दावा आहे की या दहशतवाद्यांची १७ सप्टेंबर २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक झाली होती. यामध्ये त्यांनी यूपी आणि देशातील प्रमुख ठिकाणांवरील हल्ल्याच्या रणनीतीवर चर्चा केली होती. या भेटीनंतर सोशल मीडियावर भडकाऊ गोष्टी पसरू लागल्या.
Join Our WhatsApp Community