महामार्गाने जातांना ‘न्यू इंडिया हॉटेल’, ‘स्टार बेकरी’ अशी नावे दिसतात. अनेक हिंदू या हॉटेलमध्ये जातात. उत्तरप्रदेश सरकारने आता ओळख लपवून व्यवसाय करणाऱ्या हॉटेल मालकांचा बुरखा फाडला आहे. उत्तरप्रदेशातील (UP Government) कांवड यात्रेपूर्वी (Kawad Yatra 2024) मुजफ्फरनगरमध्ये अन्न, पेये आणि फळे विकणाऱ्या दुकानदारांना त्यांची नावे ठळकपणे प्रदर्शित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
इतकेच नाही, तर त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांची नावेही लिहावी लागतील. ग्राहकांना ते कोणाकडून वस्तू खरेदी करत आहेत हे कळावे, यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी हा आदेश राज्यभरात लागू केला आहे. या आदेशानंतर मुजफ्फरनगरमधील दुकानदारांनी त्यांच्या दुकानांसमोर त्यांची खरी नावे लिहिली आहेत.
(हेही वाचा – Conflict In MVA : संजय राऊत यांनी ‘मविआ’त नव्या वादाला तोंड फोडले; ‘मविआ’चा चेहेरा उद्धव ठाकरे?)
‘चाय लव्हर पॉईंट’ झाले ‘वकील अहमद टी स्टॉल’
मुझफ्फरनगर पोलिसांच्या निर्देशानंतर दिवशी, या भागातून जाणाऱ्या दिल्ली-डेहराडून राष्ट्रीय महामार्ग-58 वरील हॉटेलच्या पाट्यांमध्ये लक्षणीय बदल झाले. फहीम नावाची मुस्लिम व्यक्ती चालवत असलेल्या चहाच्या दुकानाला पूर्वी ‘चाय लव्हर पॉईंट’ असे नाव देण्यात आले होते. आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ‘वकील अहमद टी स्टॉल’ असे नामकरण करण्यात आले आहे.
‘संगम शुद्ध भोजनालय’ झाले ‘सलीम शुद्ध शाकाहारी भोजनालय’
दरम्यान, ‘संगम शुद्ध भोजनालय’ या नावाने 25 वर्षांपासून चालणाऱ्या रस्त्यालगतच्या भोजनालयाचे नाव आता ‘सलीम शुद्ध शाकाहारी भोजनालय’ असे करण्यात आले आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यात असलेले हे भोजनालय 25 वर्षांपासून संगम शुद्ध भोजनालय म्हणून ओळखले जात होते, परंतु प्रशासनाने ते नाव बदलण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्ली-डेहराडून महामार्गावरील साक्षी हॉटेलचे मालक लोकेश भारती म्हणाले की, दोन पोलीस अधिकारी त्यांच्याकडे आले आणि त्यांनी हॉटेलचे नाव ठळकपणे प्रदर्शित करण्यास सांगितले. त्यांनी त्यांना हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची नावेही दाखवण्यास सांगितले. या निर्देशानंतर भारती यांनी आपल्या हॉटेलमधून चार मुस्लिम कर्मचाऱ्यांना तात्पुरते काढून टाकले आहे. (UP Government)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community