सध्या देशात कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. कोरोना रुग्ण झपाट्याने घटत असल्याने, शासनाने निर्बंधही शिथील केले आहेत. गेल्या 24 तासांत 1 हजार 778 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनाबाधीत 62 जणांचा मृत्यू झाला आहे. यात आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयाने 5 जिवंत लोकांना मृत दाखवलं आहे. तसेच, कोरोना मृतांना मिळणा-या पैशासाठीदेखील अर्ज केला आहे. हा संतापजनक प्रकार उत्तर प्रदेशातील कानपूरमधून समोर आला आहे.
यादी बघून बसला धक्का
पाच जिवंत लोकांना मृत घोषित केले, एवढेच नाही तर कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर मिळणा-या नुकसान भरपाईसाठीदेखील अर्ज करण्यात आला. कोरोना मृतांच्या घरच्यांना जी शासनाकडून 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. त्याची यादी जेव्हा अधिका-यांकडे देण्यात आली, तेव्हा ते स्तब्धच झाले. कारण या यादीतील मृत दाखवलेले व्यक्ती जिवंत होते.
( हेही वाचा: आता आयकर विभागाची कारवाई, टार्गेट उद्योगपती! )
कडक कारवाईचे आदेश
जीएसवीएम मेडिकल काॅलेजमध्ये जास्त घोटाळा झाला आहे. येथील तीन लोकांना मृत दाखवण्यात आलं आहे. तर नारायण मेडिकल काॅलेज आणि एमकेसीएच रुग्णालयाने प्रत्येकी एक जिवंत रुग्णाला मृत घोषीत केले आहे. या प्रकारानंतर आता अधिका-यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
Join Our WhatsApp Community