उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बस्ती (Basti) जिल्ह्यात लव्ह जिहादचा (Love jihad) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ठिकाणी एका हिंदू (Hindu) मुलीला ड्रायव्हर अहमद रझाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे वचन देत शारीरिक आणि मानसिक छळ केला. पीडितेने सांगितले की, अहमदने केवळ तिच्या भावनांशी खेळ केला नाही तर नमाज अदा करायला लावणे, गोमांस खाण्यास भाग पाडले. (Love jihad)
( हेही वाचा : churchgate railway station : असा आहे चर्चगेट स्टेशनचा इतिहास! पूर्वी या स्थानकाचे नाव काय होते?)
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बस्ती (Basti) जिल्ह्यातील वाल्टरगंज पोलिस स्टेशन परिसरातील पीडित मुलीच्या घरात ड्रायव्हर म्हणून अहमद रझा काम करत होता. जमदाशाही येथील रहिवासी अब्दुल नैद (Abdul Naid) यांचा मुलगा अहमद पीडितेला दररोज त्रास देत असे. पीडितेने भीतीमुळे कुटुंबाला याबाबत काहीही सांगितले नाही. पण फेब्रुवारी २०२४ मध्ये, अहमदने चाकूचा धाक दाखवून पीडितेवर बलात्कार केला. जेव्हा तिने पोलिसांकडे जाण्याची धमकी दिली तेव्हा अहमदने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देऊन तिला गप्प केले. कुटुंबाने या लग्नाला नकार दिला, परंतु अहमदने तिला फसवले आणि घरातून तिला घेऊन पळून गेला. त्याने सोबत दोन सोन्याचे नेकलेस, तीन सोन्याच्या साखळ्या, १ लाख रुपये, एक कार, एक स्कूटर, एक कूलर आणि एक वॉशिंग मशीन नेले. (Love jihad)
सुरुवातीला, अहमद तिला त्याच्या नातेवाईकांच्या घरी घेऊन गेला आणि नंतर रुधौली पोलिस स्टेशन हद्दीतील पुरैना चौकात भाड्याच्या घरात राहू लागला. मात्र लग्नाबद्दल विचारपूस करता अहमद तो विषय टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर दोघांचाही निकाह झाला. (Love jihad)
पीडित हिंदू (Hindu) मुलीने आरोप केला आहे की एके दिवशी अहमदचे आईवडील आणि बहिणी मोमिना आणि फातिमा आल्या आणि म्हणाल्या, “नमाज पठण करा, गोमांस खा, रमजानमध्ये रोजा ठेव.” पीडितेने नकार दिल्यावर तिला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. पीडितेने सांगितले की, अहमदने तिचे सर्व दागिने विकले, तिची स्कूटर ३५,००० रुपयांना गहाण ठेवली आणि सर्व पैसे त्याच्या कुटुंबाला दिले. त्याहून कळस म्हणजे, पीडितेचा तीनदा गर्भपात करण्यात आला. त्यात आता ती पुन्हा गर्भवती आहे. (Love jihad)
दरम्यान पीडित मुलीने धाडस दाखवत वाल्टरगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. डीएसपी सत्येंद्र भूषण तिवारी म्हणाले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अहमदला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. तपास आणि वैद्यकीय अहवालानंतर न्यायालयात जबाब नोंदवले जातील. पीडितेला लवकर न्याय मिळाला नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा विश्व हिंदू महासंघाचे जिल्हाध्यक्ष अखिलेश सिंह (Akhilesh Singh) यांनी दिला. हे प्रकरण फक्त एका मुलीची कहाणी नाही तर समाजासमोर एक प्रश्न आहे – निष्पाप जीव किती काळ अशा शोषणाचे बळी ठरत राहतील? असाही प्रश्न करण्यात आला आहे. (Love jihad)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community