व्यायामशाळा मालक रझा खानने हिंदू तरुणीला अडकवले Love jihad च्या जाळ्यात; आधी अत्याचार, मग धर्मांतरणासाठी दबाव

49
व्यायामशाळा मालक रझा खानने हिंदू तरुणीला अडकवले Love jihad च्या जाळ्यात; आधी अत्याचार, मग धर्मांतरणासाठी दबाव
व्यायामशाळा मालक रझा खानने हिंदू तरुणीला अडकवले Love jihad च्या जाळ्यात; आधी अत्याचार, मग धर्मांतरणासाठी दबाव

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) लव्ह जिहादचे (Love jihad) एक प्रकरण समोर आले आहे. व्यायामशाळेत जाणाऱ्या एका हिंदू (Hindu) तरुणीला व्यायामशाळा (Gym) मालक रझा खानने (Raza Khan) प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर तरुणीवर बलात्कार केला. ज्यावेळी तरुणीला रझा खानची खरी ओळख कळली तेव्हा त्याने पीडित तरुणीला इस्लाम (Islam) स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला.

( हेही वाचा : Tariff War : डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन सोडून इतर देशांची आयात शुल्क वाढ का थांबवली? पाहूयात ३ कारणे

लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून केला बलात्कार, व्हिडिओ बनवून केला ब्लॅकमेल

काही दिवसांपूर्वीच रोरावार पोलिस ठाण्यात (Rorawar Police Station) व्यायामशाळा मालक रझा खानविरुद्ध (Raza Khan) तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवताना पीडितेने संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. पीडितेने सांगितले की, व्यायामशाळा (Gym) मालक रझा खानने (Raza Khan) त्याचे नाव राजा असल्याचे सांगून पीडितेशी ओळख वाढवली. नंतर पीडितेला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच आरोपीने पीडितेचा अश्लील व्हिडिओ बनवला. आणि पीडितेला आरोपीची खरी माहिती कळली तेव्हा रझा खानने तरुणीला धमकावत इस्लाम (Islam) स्वीकारण्यासाठी आणि निकाह करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. (Love jihad)

दरम्यान विवाहित असण्यासोबतच, रझा खान (Raza Khan) दोन मुलांचा पिता देखील आहे. पीडितेने सांगितले की, जेव्हा ती व्यायामशाळेत (Gym) जाऊ लागली तेव्हा रझा खान तिला तिथे प्रशिक्षण देत असे. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरु झाला. त्याने आपले नाव रझा असल्याचे सांगितले. या काळात ती त्यांच्यासोबत काही वेळ बाहेरही गेली. (Love jihad)

पीडितेचे म्हणणे आहे की, व्यायामशाळा चालवणाऱ्या रझा खानने (Raza Khan) आपले नाव आणि धर्म लपवून तिच्याशी मैत्री केली आणि तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.यावेळी त्याने अश्लील व्हिडिओ आणि फोटो बनवले. जेव्हा त्याची ओळख उघड झाली तेव्हा त्याने पीडितेला व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. रझा खानने पीडितेवर निकाह करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. पीडितेने नमाज पठण सुरू करावे अशी रझा खानची (Raza Khan) इच्छा होती. (Love jihad)

हिंदू (Hindu) पीडितेने रझा खानपासून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. पीडितेच्या कुटुंबियांनी तिचे लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवले. यामुळे संतापलेल्या रझा खानने मुलीचे लग्न होत असलेल्या ठिकाणी व्हिडिओ आणि फोटो पाठवले. यामुळे संबंध तुटले. कंटाळून कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली. (Love jihad)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.