लखनऊचे नाव बदलणार! मुख्यमंत्री योगींनी दिले संकेत  

90

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊमध्ये बैठक झाली. या भेटीच्या आधी मुख्यमंत्री योगी यांनी जे ट्विट केले होते, त्यामुळे जोरदार चर्चा सुरु झाली होती, कारण त्या ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री योगी यांनी उत्तर प्रदेशातील नवाबांचे शहर असलेल्या लखनऊचे नावही बदलले जाईल, असे संकेत दिले आहेत.

लखनऊचा लक्ष्मण नगरी असा केला उल्लेख 

पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री योगी यांनी ट्विटमध्ये लिहिले होते, शेषावतार भगवान श्री लक्ष्मणजींच्या पवित्र नगरी लखनऊमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आणि अभिवादन. या ट्विटमध्ये नाव बदलण्याचा कोणताही स्पष्ट उल्लेख नसला तरी हे बदलाचे संकेत मानले जात आहेत. योगींनी ‘लक्ष्मणाची पवित्र नगरी’ असे लिहिल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. अनेकांनी लखनऊचे नाव बदलल्यास नवीन नावांचाही विचार केला आहे. लक्ष्मणपुरीपासून लक्ष्मणनगरपर्यंत अनेक नावांची चर्चा सुरू आहे. सरकारने किंवा कोणत्याही मंत्र्याने अशी कोणतीही घोषणा किंवा शक्यता व्यक्त केलेली नाही. उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने अनेक ठिकाणांची नावे बदलल्याने लखनऊचेही नाव बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधी योगी सरकारने नैनी परिसराचे नाव बदलून अटलबिहारी बाजपेयी नगर, विमानतळाचे नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय विमानतळ आणि ओव्हर ब्रिजचे नाव श्यामा प्रसाद मुखर्जी असे करण्यात आले आहे. याआधीही अलाहाबादला प्रयागराज, फैजाबाद हे अयोध्या झाले आहे. आता यात लखनऊ शहराची भर पडण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी मंदिर असल्याचा ‘तो’ व्हिडिओ ठरणार महत्वाचा पुरावा!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.