देशातील वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर कोळशाची जलद वाहतूक होणे आवश्यक आहे. त्यामुळे मालगाड्यांना वेगाने वाहतूक करता यावी, म्हणून रेल्वेने प्रवासी गाड्या काही दिवसांसाठी रद्द केल्या आहेत. भारतातील रेल्वेचे कार्यकारी संचालक गौरव कृष्ण बन्सल यांनी ही माहिती दिली.
म्हणून गाड्या रद्द
यासंदर्भात बन्सल म्हणाले की, देशाच्या ब-याच भागांमध्ये सध्या दीर्घकाळ ब्लॅकआउट झाले आहे. त्यामुळे वीजनिर्मिती वेगाने व्हावी या उद्देशाने प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत. परिस्थिती सामान्य होताच प्रवासी सेवा पूर्ववत केल्या जातील. कोळसा पॉवर प्लांटमध्ये नेण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याचा रेल्वेचा प्रयत्न असल्याचे बन्सल यांनी सांगितले. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील 8 महत्वाच्या प्रवाशी गाड्या काही काळासाठी रद्द करण्यात आल्या आहेत.
( हेही वाचा: अमित साटमांची Electric Bus खरेदीच्या निविदा प्रक्रीयेवरुन आदित्य ठाकरेंवर टीका )
या गाड्या रद्द
रद्द झालेल्या गाड्यांमध्ये लखनौ-मेरठ एक्सप्रेस (22453), प्रयागराज संगम-बरेली एक्सप्रेस(14307, बरेली-प्रयागराज संगम एक्सप्रेस(14308)- रोजा-बरेली एक्सप्रेस (04379)- मुरादाबाद-काठगोदाम एक्सप्रेस (05332)- मेरठ-लखनऊ एक्सप्रेस (22454)- बरेली-रोजा एक्सप्रेस (04380) आणि शामिल- काठगोदाम-मुरादाबाद एक्सप्रेस(05331) या गाड्यांचा समावेश आहे. यासोबतच कोळशाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे आपल्या ताफ्यात आणखी एक लाख वॅगन्स जोडण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, मालाची जलद वितरण करण्यासाठी ते समर्पित फ्रेट कॉरिडॉर देखील निर्माण केला जात असल्याचे बन्सल यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community