“इस्लाममध्ये सर्व चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन दिले आहे. मला पूर्ण इस्लाम माहीत नाही, हे मी मान्य करतो, परंतु मौलाना आणि मुफ्ती करू शकत नाहीत, अशा चुकीच्या कृत्यांचा निषेध करण्याचे धाडस माझ्यात आहे. मी हे पुस्तक फक्त जाळून टाकत आहे. या लोकांनी बांगलादेशी हिंदूंशी जे केले ते देखील चुकीचे आहे. हे मुस्लिम बांगलादेशी हिंदूंसाठी बोलणाऱ्या स्वामी रामगिरी महाराजांविरोधात ‘सर तन से जुदा “च्या घोषणा देत आहेत”, असे म्हणून उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) बुलंदशहर येथील इम्रान नावाच्या युवकाने कुराण जाळले आहे.
(हेही वाचा – मंत्रालयातील कामकाज ई ऑफिसद्वारे होणार; CM Eknath Shinde यांची माहिती)
तीन बहिणींना तीन तलाक आणि हलाला
इम्रानने इस्लाममधील कुप्रथांचा तीव्र निषेध नोंदवला आहे. त्याच्या तीन बहिणींना तीन तलाक देण्यात आला. त्यांच्यावर हलालासारखे गलिच्छ अत्याचार आले. या काळात त्याच्या एका बहिणीला एक मुलगा देखील झाला. तो कोणाचा मुलगा आहे, हे माहीत नाही; कारण तिचे सासरे आणि मेहुण्याने तिच्या बहिणीसोबत हलाला बनवला होता, अशी संतप्त प्रतिक्रिया इम्रानने दिली आहे. ‘मला इस्लाम सोडून हिंदु धर्मात परत जायचे आहे’, अशी इच्छा इम्रानने व्यक्त केली आहे.
कुराण काफिरांची हत्या करण्याचे सुचवते
इस्लाम हा कधीही शांततापूर्ण धर्म नव्हता आणि त्याचे पालन करणारे लोक चूक करत होते. “कुराण काफिरांची हत्या करण्याचे सुचवते, ते किशोरवयीन तलाक आणि हलाला प्रथांना प्रोत्साहन देते, ज्यामुळे महिलांचा अनादर होतो. हा न्याय आहे का ? आज अनेक जण अल्पवयीन मुलांवर बलात्कार करत आहेत, त्यांना शिवीगाळ करत आहेत. लोक अल्पवयीन मुलांचे बालपण कसे हिरावून घेऊ शकतात ? इस्लाममध्ये समानता नाही “, असेही इम्रानने म्हटले आहे.
तो पुढे म्हणाला की, ‘स्वामी रामगिरी महाराज जे काही म्हणाले ते सर्व बरोबर होते. या मुस्लिमांनी स्वामी रामगिरी महाराजांनी सांगितलेला संदर्भ काढून टाकला आणि त्यांच्यावर ईश्वरनिंदेचा आरोप केला. मी या सर्वांच्या विरोधात आहे, हे कृत्य करीत आहे आणि सनातन धर्म स्वीकारत आहे.’
#बुलन्दशहर: कलाम-ए-पाक की बेहुरमती करने वाले युवक इमरान को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। आज इमरान ने सोशल मीडिया पर कुरान शरीफ और इस्लाम को लेकर अमर्यादित टिप्पणी की थी।
एसपी देहात रोहित मिश्रा को सुनिए… pic.twitter.com/dyzVkN9Qdt
— Shah Nawaz journalist (News 24) (@Shahnawazreport) September 1, 2024
या घटनेचा व्हिडिओ सुपर लाइव्ह न्यूजने पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुसलमानांनी इम्रानचा जोरदार विरोध केला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आणि इम्रानला अटकही केली आहे. (Uttar Pradesh)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community