देहराडूनमध्ये विश्व हिंदू परिषद (Vishwa Hindu Parishad) आणि बजरंग दलाने (Bajrang Dal) दि. २२ जानेवारी रोजी काँग्रेस (Congress) नेते यशपाल आर्य यांच्याविरोधात निदर्शन केले. आर्य यांनी काही दिवसांपूर्वी ‘जय इस्लाम’ असा नारा दिला होता. त्यांनी मुस्लिमांच्या मतांसाठी लांगुलचालन करत ही घोषणा दिल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली. आर्य यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून विश्व हिंदू परिषदेने (Vishwa Hindu Parishad) त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
( हेही वाचा : Kho-Kho World Cup : पुढचा खो-खो विश्वचषक भारताबाहेर बर्मिंगहॅममध्ये होणार आयोजित)
दरम्यान विश्व हिंदू परिषदेने (Vishwa Hindu Parishad) काँग्रेस (Congress) सरकार आणि यशपाल आर्य यांना काँग्रेस तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. यशपाल आर्य यांनी उत्तराखंडमधील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्या भाषणाचा समारोप करताना “जय हिंद, जय भारत, जय उत्तराखंड, जय इस्लाम”, अशी घोषणा दिली होती. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
आर्य यांच्या विधानामुळे हिंदू (Hindu) संघटनांकडून संताप व्यक्त केला जात असून त्यांना धारेवर धरले आहे. विकास वर्मा नावाच्या विहिंपशी संबंधित कार्यकर्त्याने सांगितले की, उत्तराखंड ही आमची संस्कृती आहे. ही संस्कृती वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच आम्ही बाहेरून होणारी अवैध घुसखोरी रोखण्याचा प्रयत्न करत आहोत. काँग्रेस नेते निव्वळ तुष्टीकरण करत आहेत. काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे तिर्थक्षेत्रांचा अवमान झाला असल्याचे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे. (Vishwa Hindu Parishad)
मी ‘जय इस्लामनगर’ म्हणलो, इस्लाम नाही
दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यावर यशपाल आर्य म्हणाले की, माझ्या व्हिडिओतील विधानाचा विपर्यास केला जात आहे. त्यामुळे याविरोधात आता मीही कारवाई करणार आहे. संभाषण समारोपादरम्यान जय इस्लामनगर असे मी म्हणालो होतो, मात्र काहींनी त्या व्हिडिओमध्ये काट छाट केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community