Uttarakhand Tourism: आता पर्यटकांना घेता येणार भव्य हिमालय सफरीचा आनंद, उत्तराखंड पर्यटनने सुरू केली भारतातील पहिली एअर सफारी योजना

उत्तराखंडमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारकडून ही योजना आखण्यात आली आहे.

220
Uttarakhand Tourism: आता पर्यटकांना घेता येणार भव्य हिमालय सफरीचा आनंद, उत्तराखंड पर्यटनने सुरू केली भारतातील पहिली एअर सफारी योजना
Uttarakhand Tourism: आता पर्यटकांना घेता येणार भव्य हिमालय सफरीचा आनंद, उत्तराखंड पर्यटनने सुरू केली भारतातील पहिली एअर सफारी योजना

उत्तराखंड पर्यटनाने (Uttarakhand Tourism) भारतातील पहिली जायरोकॉप्टर सेवा सुरू केली आहे. भारतात प्रथम या सेवेची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

  या सेवेबाबत म्हणणे आहे की, जायरोकॉप्टरच्या माध्यमातून भव्य हिमालयाचे दर्शन देण्यास लवकरच सुरुवात केली जाईल. या सेवेची प्रायोगिक चाचणी शनिवारी हरिद्वार येथे घेण्यात आली. उत्तराखंडमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारकडून ही योजना आखण्यात आली आहे तसेच १६ डिसेंबर २०२३ ला हरिद्वारमधील बैरागी कॅम्प येथे पहिली जायरोकॉप्टर उड्डाण चाचमी यशस्वीरित्या पूर्ण झाली. यामुळे राज्याच्या पर्यटनाला एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली.

(हेही वाचा – Nirmala Sitharaman: गुगल प्ले स्टोअरवरून २,५०० अॅप्स काढून टाकले, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती; कारण वाचा सविस्तर…)

टूरिस्ट हिमालयन एअर सफारी योजनेच्या माध्यमातून या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे पर्यटक आकाशात उड्डाण घेऊ शकतात, भव्य हिमालयाच्या पर्वतरांगा आणि झुळुझुळु वाहणाऱ्या नद्या…या सर्व निसर्गसौंदर्याचा आनंद पर्यटकांना जायरोकॉप्टरमधून हवाई उड्डाणाद्वारे घेता येणार आहे.

पर्यटकांना उत्तराखंडचे सौंदर्य पाहण्याचा सुरक्षित मार्ग 
उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कर्नल अश्विनी पुंडीर या उड्डाण चाचणीत सहभागी झाले होते. ते म्हणाले की, लवकरच हिमालय एअर सफारी योजना राज्यातील विविध पर्यटन स्थळांवर सुरू केली जाईल. या योजनेत पर्यटक जायरोकॉप्टर हिमालयाच्या शिखरांवर उड्डाण करतील. याबाबत अधिक माहिती देताना कर्नल पुंडीर म्हणाले की, उत्तराखंड पर्यटन पर्यटकांना उत्तराखंडचे सौंदर्य पाहण्याचे सुरक्षित आणि अद्वितीय मार्ग देत आहे. जर्मनीकडून अत्याधुनिक जायरोकॉप्टर्स खरेदी करण्यात आली आहेत आणि सुरुवातीला या मोहिमांचे नेतृत्व कुशल प्रशिक्षित जर्मन वैमानिक करतील. विविध निसर्गरम्य ठिकाणी विशेष हवाई पट्ट्या विकसित करण्याच्या योजना यानिमित्ताने सुरू होत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.