Uttarkashi Tunnel Accident : ४० मजुरांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न ,शक्तिशाली यंत्राच्या सहाय्याने खोदकाम

88
Uttarkashi Tunnel Accident : ४० मजुरांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न ,शक्तिशाली यंत्राच्या सहाय्याने खोदकाम
Uttarkashi Tunnel Accident : ४० मजुरांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न ,शक्तिशाली यंत्राच्या सहाय्याने खोदकाम

उत्तराखंडमध्ये यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम सुरु असलेल्या सिलक्यारा बोगद्याचा काही भाग रविवारी पहाटे कोसळला. तेव्हापासून बोगद्यात ४० मजूर अडकले आहेत.तर त्यांच्या सुटकेसाठी नव्याने प्रयत्न सुरू करण्यात आले.मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बोगद्यात ऑक्सिजन पुरवणाऱ्या पाइपच्या माध्यमातून खाण्यापिण्याच्या वस्तू, वीज, औषधे पुरवली जात आहेत.दिल्लीहून हवाई दलाच्या विमानाने वाहून आणलेल्या अतिशय शक्तिशाली (हेवी डय़ुटी) ड्रिलग यंत्राने बोगद्याच्या ढिगाऱ्यातून गुरुवारी खोदकाम सुरू केले. (Uttarkashi Tunnel Accident)

अमेरिकेत निर्मित ‘ऑगर’ या यंत्राने काम सुरू करण्यापूर्वी सिल्क्यरा बोगद्याबाहेरील मजुरांनी पूजा केली. नव्या यंत्राद्वारे खोदकाम सुरू झाले, त्या वेळी बचावकार्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री व्ही.के.सिंह घटनास्थळी पोहोचले.एका लहान ऑगर यंत्राच्या साहाय्याने पोलादाच्या नलिका ढिगाऱ्यात घालण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर भारतीय हवाई दलाने हे उपकरण तुकडय़ा-तुकडय़ाने त्यांच्या सी-१३० हक्र्युलस वाहतूक विमानाने सुमारे तीस किलोमीटर अंतरावरील धावपट्टीपर्यंत नेले. (Uttarkashi Tunnel Accident)

(हेही वाचा :Grant Road Building Fire : बहुमजली इमारतीला भीषण आग)

मात्र बचावकार्यात आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्याआधीही बचावकार्य पूर्ण होऊ शकतो पण सध्याच्या परिस्थितीत काही अडचण आली तर त्यावर मात करू शकतो. आमचं प्राधान्य त्यांना सुखरुप बाहेर काढण्याला आहे. ताशी पाच ते दहा मीटर या वेगाने खोदून ते लवकरच अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचेल अशी आम्हाला आशा आहे’ , असे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी डेहराडूनमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.