उत्तराखंडमधील सिल्कयारा बोगद्यामध्ये अडकलेले ४१ कामगार सुरक्षित असल्याची चित्रफीत मंगळवारी ‘एनडीएमए’ने (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) प्रसृत केली. एंडोस्कोपी कॅमेऱ्यातून हे सर्व कामगार सुरक्षित असल्याचे पहावयास मिळाले आहे. त्यांचे व्हिडिओ चित्रणही प्रसिद्ध करण्यात आले आहे.कामगारांच्या सुखरूप सुटकेसाठी मंगळवारी आडव्या दिशेने खोदकाम करण्यास सुरूवात करण्यात आली.हे कामगार आत अडकून आता २४० तास होऊन गेलेले आहेत. (Uttarkashi Tunnel Accident)
त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी विदेशातून बोगदा तज्ञांना आणण्यात आलेले असून आता त्यांना बोगद्याच्या वरुन ड्रिलींग करुन काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी नवीन यंत्रे आणण्यात आली असून त्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. बोगद्याच्या मागच्या बाजूस असणाऱ्या बारकोट येथून बोगद्यात जाण्याचा मार्ग काढण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्यासाठी एकाच वेळी पाच आघाड्यांवर प्रयत्न सुरू आहेत. सध्याच्या परिस्थितीत उभ्या दिशेने खोदकाम करताना खडक लागत असल्यामुळे आडव्या दिशेने खोदण्यावर भर दिला जात आहे’’, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले आहे.कामगारांच्या सुटकेसाठी मंगळवारी दहाव्या दिवशी बचावकार्य सुरू होते. अमेरिकी ‘ऑगर मशीन’द्वारे मोठ्या व्यासाचे पोलादी पाईप टाकून सुटकेचा मार्ग तयार करण्याचे काम तीन दिवसांनंतर पुन्हा सुरू करण्यात आले आहे. (Uttarkashi Tunnel Accident)
(हेही वाचा : Indias Air and Space Force: हैदराबादमध्ये स्पेस वॉर ट्रेनिंग कमांड सेंटर, ‘या’ नव्या नावासह हवाई दलाची मोठी तयारी)
कुटुंबीयांना दिलासा
सोमवारी संध्याकाळी दिल्लीहून ‘एंडोस्कोपिक फ्लॅक्सी कॅमेरा’ आणल्यानंतर बंद बोगद्यात तो सोडण्यात आला. या कॅमेऱ्याद्वारे केलेल्या चित्रीकरणात पांढऱ्या रंगांचे हेल्मेट घातलेले कामगार पाईपलाइनद्वारे मिळत असलेली भोजनसामग्री घेत असताना आणि परस्परांशी बोलताना दिसत आहेत. ती चित्रफीत पाहून त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.
विशेष आहार नियोजन
बोगद्यातील कोंदट हवेमुळे या कामगारांना आजार होऊ नयेत तसेच त्यांना पचनाचे विकार जडू नयेत यासाठी त्यांच्यासाठी वैद्यकीय आहार तज्ञांच्या साहाय्याने विशेष आहार नियोजन करण्यात आले आहे. त्यांना पचण्यास हलका पण शक्तीवर्धक आहार देण्यात येत आहे. गरम खिचडीप्रमाणेच त्यांना ताजी फळे, गव्हाची खीर आणि इतर खाद्यपदार्थ पुरविण्यात येत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community