उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi) शहरामध्ये निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळल्याने ३६ मजूर आतमध्ये अडकले आहेत. २४ तासांनंतरही अडकलेल्या मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यात येत आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाईपच्या मदतीने ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे. (Uttarkashi Tunnel Accident)
पोकळीतून पडणारा ढिगारा शॉर्ट क्रिएटिंग मशीन वापरून थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, पण या प्रयत्नाला यश येत नाही. सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना २४ तासांहून अधिक काळ लोटला आहे. बोगद्यात ३६ कामगार अडकले आहेत. कामगारांना वाचवण्यासाठी रात्रभर बचावकार्य सुरू होते. अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीच्या माध्यमातून संपर्क साधला जात आहे. कामगारांनी आपण सुरक्षित असल्याचे सांगितलं आहे. ‘बोगद्याचा कोसळलेला भाग सुरुवातीपासून सुमारे २०० मीटर आत आहे. आतमध्ये अडकलेल्या कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून तेथे ऑक्सिजन पाइप टाकण्यात आला आहे. या कामगारांसाठी अन्नपदार्थही पाठवले जात आहेत. कामगारांचे प्राण वाचवण्यास प्राधान्य असून, लवकरच त्यांची सुटका केली जाईल.
(हेही वाचा : Chhatrapati Sambhaji nagar : फटाक्यांमुळे १० ठिकाणी आगीच्या घटना, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही)
अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, ”SDRF, NDRF आणि राज्य प्रशासनाचे पथक उत्तरकाशीतील सिल्क्यराजवळ बोगद्याच्या बांधकामादरम्यान झालेल्या दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करत आहेत.” त्यांनी स्वतः बचाव कार्यावर सतत लक्ष ठेवल्याची माहिती दिली आहे.
पंतप्रधानांनी फोनवरून घेतली माहिती
हिमाचल प्रदेशातील लेपचा येथून परत येताना पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तरकाशीच्या सिल्क्यराजवळ बोगद्याच्या बांधकामादरम्यान आलेल्या ढिगाऱ्यांमुळे बोगद्यात अडकलेल्या मजुरांची स्थिती, मदत आणि बचावकार्य याबाबत फोनद्वारे सविस्तर माहिती घेतली, असं मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितलं आहे. कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी राबविण्यात आलेल्या बचावकार्याची सविस्तर माहिती पंतप्रधानांना देण्यात आली आणि परिस्थितीची माहिती देण्यात आली, असंही त्यांनी सांगितलं आहे. पंतप्रधानांनी यासंबंधित सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. केंद्रीय एजन्सींना भारत सरकारने मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community