उत्तर काशीतील सिलक्यारा (Uttarkashi Tunnel Accident) बोगद्यात १७ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी डोंगरावरून ड्रिलिंग सुरू असताना लवकरच हाताने खोदकाम करून कामगरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाने (NDMA) (National Disaster Management Authority) दिली.
ऑगरने ४६.८ मीटरपर्यंत आडवे खोदकाम करण्यात आले होते. ऑगर मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर आता हाताने खोदकाम केले जाणार आहे. बोगद्याच्या बारकोटच्या टोकापासून आडवे ड्रिलिंग करण्याच्या पर्यायांवरही विचार केला जात आहे. ८६ मीटर उभे ड्रिलिंग बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी करण्यात येणार आहे. १.२ मीटर व्यासाचा पाइप बोगद्याच्या वरून खालपर्यंत उभा घातला जाणार आहे. ३६ मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंग पूर्ण झालं.
(हेही वाचा – Lalbaug Accident : मुंबईतील लालबाग पुलावर भीषण अपघात दोन ठार तीन गंभीर जखमी )
पंतप्रधानांच्या सचिवांकडून प्रोत्साहन…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी सोमवारी सिलक्यारा बोगद्यात गेल्या २ दिवसांपासून अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या बचाव कार्याचा आढावा घेतला. अधिकारी, अभियंते आणि कामागारांशी बोलून त्यांना या कामाबाबत प्रोत्साहन दिले. मिश्रा यांनी बचावकार्यातील अडचणी समजून घेतल्या.
अदानी समुहाचे स्पष्टीकरण…
बोगद्याच्या बांधकामाशी आमचा संबंध नाही. बांधकामातील कंपनीमध्ये समुहाची भागीदारी नाही, असे उद्योगपती गौतम अदानी यांच्या समुहाने स्पष्ट केले. बांधकामात समुहाचा सहभाग असल्याचा संशय समाजमाध्यमांवर व्यक्त केला जात असताना अदानी समुहाने स्पष्टीकरण दिले.
सार्वजनिक संस्थांचाही बचावकार्यात सहभाग…
कामगारांना बाहेर काढण्यासाठी ‘रॅट-होल’ची मदत घेतली जाणार आहे. याअंतर्गत हाताने खोदण्यास सुरुवात करतील. ऑगर मशीनचे तुटलेले भाग काढण्यात आले आहेत. खासगी आणि सार्वजनिक संस्था बचावकार्यात आहेत, अशी माहिती एनडीएमएचे सदस्य सय्यद अता हसनैन यांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community