Uttarkashi Tunnel Accident : तब्बल ९ दिवसांनंतर पहिल्यांदा मजुरांना मिळाली खिचडी, पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा

221
Uttarkashi Tunnel Accident : तब्बल ९ दिवसांनंतर पहिल्यांदा मजुरांना मिळाली खिचडी, पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा

उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४१ मजूर १२ नोव्हेंबरपासून अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवलं जात आहे. आज (२१ नोव्हेंबर) या बचावकार्याचा दहावा दिवस आहे.

अशातच आता बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सोमवारी (२० नोव्हेंबर) पहिल्यांदाच अन्न पाठवण्यात आलं. नऊ दिवसानंतर पहिल्यांदाच बोगद्यामध्ये अडकलेल्या मजुरांना खिचडी पाठवण्यात आली. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

(हेही वाचा – Manoj Jarange Thane Sabha : पोलिसांकडून वाहतूक मार्गात मोठे बदल, कोणते रस्ते राहणार बंद?)

जीवनावश्यक वस्तू पाठवण्याची योजना

कामगारांना जेवण मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये दिलासादायक वातावरण आहे. मजुरांचे कुटुंबिय बोगद्याच्या बाहेर त्याच्या परतीची वाट पाहत आहेत. सिल्क्यरा येथील बोगद्यात अडकलेल्या मजुरांसाठी पाइपलाइनद्वारे औषधे, संत्री आणि ज्यूस पाठवण्यात येत आहे. याशिवाय मजुरांशी वॉकीटॉकीने संपर्क सुरु आहे. बोगद्यामध्ये चार्जर आणि बॅटरी पाठवण्याची योजना आहे.

पंतप्रधानांनी केली चौकशी

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना फोन करून मदत आणि बचाव कार्याची माहिती घेतली आहे. केंद्र आणि राज्य संस्थांच्या परस्पर समन्वयाने कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढले जाईल. अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य राखण्याची गरज आहे. (Uttarkashi Tunnel Accident)

यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री धामी यांनी सांगितले की,आपण स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून बचाव कार्यावर सतत लक्ष ठेऊन आहे. तेथे वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले आहे. बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुखरूप असून त्यांना लवकर बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

(हेही वाचा – VIP Darshan: नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात पुढील सात दिवस व्हीआयपी दर्शन बंद)

कसे अडकले कामगार ?

सिल्क्यरा बोगद्यात १२ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजता हा अपघात घडला होता. बोगद्याच्या प्रवेशाच्या २०० मीटरच्या आत ६० मीटर माती खचली आणि ४१ मजूर आत अडकले. १६ नोव्हेंबर रोजी बचाव कार्यादरम्यान, बोगद्यातून आणखी दगड पडले, ज्यामुळे मलबा एकूण ७० मीटरपर्यंत पसरला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.