Uttarkashi Tunnel Accident : ‘त्या’ मजुरांच्या सुटकेची जबाबदारी आता भारतीय लष्करांवर; ड्रोन कॅमेऱ्याने ठेवणार नजर

बचावकार्याचा १६ वा दिवस

134
Uttarkashi Tunnel Accident : 'त्या' मजुरांच्या सुटकेची जबाबदारी आता भारतीय लष्करांवर; ड्रोन कॅमेऱ्याने ठेवणार नजर

उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळून (Uttarkashi Tunnel Accident) झालेल्या दुर्घटनेत ४१ मजूर १२ नोव्हेंबरपासून अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवलं जात आहे. आज म्हणजेच सोमवार २७ नोव्हेंबर हा या बचावकार्याचा सोळावा दिवस आहे.

रेस्क्यू ऑपरेशन सुरू

दिवाळीच्या पहिल्या दिवशी माती कोसळून 41 मजूर बोगद्यामध्ये अडकले. 12 नोव्हेंबरपासून हे बचावकार्य सुरु आहे. मात्र, अद्याप मजुरांना बाहेर काढण्यात यश आलेलं नाही. आज या बचावकार्याचा 16 वा दिवस आहे. उत्तरकाशी (Uttarkashi Tunnel Accident) येथील चारधाम ऑल वेदर प्रोजेक्टच्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांची जीव वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्याचे काम सुरू असले तरी ड्रिलिंगच्या कामात सतत येणाऱ्या अडथळ्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात अडचण येत आहे. मात्र, कामगारांची प्रकृती चांगली असून त्यांना पाईपद्वारे ऑक्सिजन आणि अन्नपुरवठा केला जात आहे. (Uttarkashi Tunnel Accident)

(हेही वाचा – Nashik Rain : नाशिकमध्ये वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारपीट; कांदा, द्राक्ष पिकांचे नुकसान)

मजुरांच्या बचावकार्यात लष्कराची मदत

या बचावकार्यात भारतीय सैन्य दलही वेगाने (Uttarkashi Tunnel Accident) काम करत आहे. भारतीय लष्कराच्या अभियांत्रिकी रेजिमेंटमधील सैनिक आणि अधिकारी तंत्रज्ञानात निपुण आहेत. हे सर्वजण मॅन्युअल ड्रिलिंगच्या कामात मदत करत आहेत. याद्वारे बोगद्याच्या आत अडकलेल्या कामगारांसाठी 800 मिमी पाईपसह एस्केप पॅसेज तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

कसे अडकले कामगार ?

सिल्क्यरा बोगद्यात १२ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजता हा अपघात घडला होता. बोगद्याच्या प्रवेशाच्या २०० मीटरच्या आत ६० मीटर माती खचली आणि ४१ मजूर आत अडकले. १६ नोव्हेंबर रोजी बचाव कार्यादरम्यान, बोगद्यातून आणखी दगड पडले, ज्यामुळे मलबा एकूण ७० मीटरपर्यंत पसरला आहे. (Uttarkashi Tunnel Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.