Uttarkashi Tunnel Rescue : नितीन गडकरी यांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना केले आश्वस्त

101
Uttarkashi Tunnel Rescue : नितीन गडकरी यांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना केले आश्वस्त
Uttarkashi Tunnel Rescue : नितीन गडकरी यांनी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना केले आश्वस्त

गेल्या 7-8 दिवसांपासून आम्ही कामगारांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. (Uttarkashi Tunnel Rescue) त्यांना बाहेर काढणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. येथे काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत मी 2 तास बैठक घेतली. आम्ही 6 पर्यायी उपाययोजनांवर काम करत आहोत आणि भारत सरकारच्या विविध एजन्सी येथे कार्यरत आहेत. पंतप्रधान कार्यालयसुद्धा यावर विशेष लक्ष ठेऊन आहे. बोगदा तज्ज्ञ आणि BRO अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. सध्या आमची प्राथमिकता अडकलेल्यांना अन्न, औषध आणि ऑक्सिजन पुरवणे आहे, असे उद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) यांनी काढले आहेत. (Uttarkashi Tunnel Rescue)

(हेही वाचा – NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची ? सोमवारपासून नियमित सुनावणी)

उत्तराखंड (Uttarakhand) येथील बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी आठव्या दिवशी देखील प्रयत्न सुरु आहेत. ढिगारा खोदून त्यात पाईप टाकून मार्ग तयार करण्यासाठी आणलेल्या शक्तिशाली अमेरिकन आगर मशिनमध्ये काही बिघाड झाल्याने कामगार कुटुंबीयांची अस्वस्थता वाढू लागली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज घटनास्थळी जाऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी दोन ते अडीच दिवसांत कामगारांपर्यंत पोहचणार असल्याचे सांगितले.

(हेही वाचा – Mumbai Hawkers : फेरीवाल्यांमुळे महापालिकेचा ‘बाजार’ उठण्याची वेळ)

यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात येत असलेल्या सिल्क्यरा बोगद्याचा एक भाग १२ नोव्हेंबरला सकाळी कोसळला होता, त्यामुळे ४१ कामगार त्यात अडकले होते. बचावकार्यासाठी बराच वेळ जात असल्याने बोगद्याबाहेर थांबलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांमध्ये निराशा वाढत आहे. (Uttarkashi Tunnel Rescue)

“बीआरओकडून खास मशीन आणून रस्ते तयार केले जात आहेत. अनेक यंत्रे येथे आली आहेत. बचावकार्यासाठी सध्या दोन बोअरिंग मशीन कार्यरत आहेत. ऑगर मशीनने योग्य प्रकारे काम केले, तर येत्या दोन ते अडीच दिवसांत आम्ही अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचू शकू”, अशी आशा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

अमेरिकन ऑगर मशीन एका तासात 5 मीटरपर्यंत ड्रिलिंग करण्यास सक्षम आहे. मात्र, मध्येच खडक आल्याने ड्रिलिंगमध्ये अडचणी येत आहेत. (Uttarkashi Tunnel Rescue)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.