गुजरातच्या धर्तीवर जैन साधू संतांसह इतर साधूंनाही लस द्या! भाजपची मागणी

घाटकोपर येथील उपाश्रय येथे जैन व इतर साधू संतांना लस देण्याची जागा उपलब्ध करून देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे.

137

साधुसंतांकडे आधार कार्ड सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांच्या कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे गुजरातमधील सुरत, राजकोट, बडोदा व अहमदाबादच्या धर्तीवर धर्तीवर मुंबईतही जैन साधू संत आणि इतर साधू संत यांना लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत असून यासाठी घाटकोपर येथील उपाश्रय येथे जैन व इतर साधू संतांना लस देण्याची जागा उपलब्ध करून देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे.

आधारकार्ड नसल्याने साधू संतांना कोविडची लस देत नाही! 

मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व भाजपचे मुंबई सचिव प्रविण छेडा यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना २४ मार्च रोजी पत्र पाठवून ही मागणी केली आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आता सर्वांनाच कोविडची लस देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. पण अद्यापपर्यंत साधू संतांकडे आधारकार्ड नसल्याने कोविडची लस मिळत नाही. त्यामुळे जैन संतांना तसेच इतर धर्मीय साधूसंताना लस देण्याची व्यवस्था  करावी अशी मागणी प्रविण छेडा यांनी आपल्या  निवेदनाद्वारे केली.

(हेही वाचा : एनआयएमधून आलेल्या अधिकाऱ्याकडे सीआययूची धुरा! )

घाटकोपरमध्ये साधू संतांची लसीकरण केंद्र उभारण्याची तयारी!

गुजरात राज्यातील सुरत, राजकोट, बडोदा व अहमदाबाद या ठिकाणी लसीकरणाची सुविधा जैन साधू संतांसह इतर संतांना उपलब्ध करून दिली आहे. त्याच धर्तीवर या संतांसाठी लसीकरणाची मागणी करत भाजपचे माजी नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी जर आपणास हरकत नसेल तर आमच्या संघांनी घाटकोपर येथील उपाश्रयमध्ये जैन व इतर साधू संतांना लस देण्याची जागा उपलब्ध करून देवू शकतो, अशीही तयारी दर्शवली आहे. तरी याबाबत तात्काळ निर्णय घेवून लसीकरणाची सुविधा या जैन साधुसंतांसह इतर साधुसंतांना मुंबईमध्ये उपलब्ध करून दिली जावी,अशी मागणी त्यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.