मुंबईमध्ये लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद करण्यात आल्यानंतर दिवसभरात ३३ हजार ५५२ लसीकरण पार पडले. यामध्ये दुसरा डोस घेतलेल्या नागरीकांची संख्या ही ४,३६४ एवढी होती, तर पहिला डोस घेणाऱ्या नागरीकांची संख्या ही २९ हजार १८७ एवढी होती. त्यामुळे प्रत्येक दिवशी सरासरी ४० ते ५० हजार लोकांचे लसीकरण पार पडले जात असताना केवळ लशीचा तुटवडा जाणवू लागल्याने व केंद्र बंद करण्यात आल्याने केवळ ३३,५५२ लोकांचे लसीकरण पूर्ण दिवसात पार पडू शकले आहे.
(हेही वाचा : महापालिकेच्या प्रभाग समित्यांसह दोन विशेष समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती)
४५ ते ५९ वयोगटातील २३ हजार २२८ नागरीकांनी घेतली लस
मुंबईतील खासगी रुग्णालयांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मान्यता दिल्यानंतर ७१ ठिकाणी सुरु केलेल्या लसीकरण केंद्रांपैकी २७ केंद्र गुरुवारीच बंदी झाली होती. तर महापालिकेच्या ३३ कोविड लसीकरण केंद्रांपैकी काही केंद्रही बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे मोजक्याच महापालिका व खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण पार पडले आणि शिल्लक डोस वापरण्यात आले. यामध्ये दिवसभरात ३३ हजार ५५२ नागरीकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य सेवेतील कर्मचारी ७२४, फ्रंटलाईन वर्कर २,६१६, ज्येष्ठ नागरीक ६,९८३ आणि ४५ ते ५९ या वयोगटातील २३ हजार २२८ आदींचा समावेश आहे. त्यामुळे सर्वाधिक लसीकरण हे ४५ ते ५९ या वयोगटातील नागरिकांमध्ये झाले आहे. आतापर्यंत एकूण १६ लाख १४ हजार २७८ लोकांना लसीकरण झाले आहे. यामध्ये कोविशिल्डच्या १५ लाख २० हजार ३९ लस तर कोव्हॅक्सिनच्या ९४ हजार २३९ लस देण्यात आल्या आहेत.
Join Our WhatsApp Community