मुंबईत १२ मे १४ वयोगटातील मुलांसाठी बुधवारपासून लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ४२५ मुलांनी कोविडच्या लसीचा पहिला डोस घेतला. बुधवारी पहिल्या दिवशी १२४ मुलांनी लस घेतली होती, तर दुसऱ्या ४२५ मुलांनी डोस घेतल्याने दोन दिवसांमध्ये कोविडची लस घेतलेल्या एकूण मुलांची संख्या ५४९ एवढी झाली आहे.
कोविड अॅपमुळे गोंधळ
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबईत १६ मार्चपासून वय वर्षे १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी कोविड ऍपच्या उडालेल्या गोंधळामुळे लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी १२४ मुलांचे लसीकरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ४२५ मुलांचे लसीकरण पार पडले. यामध्ये महापालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये ४१६ मुलांचे तर सरकारी रुग्णालयांमध्ये ९ मुलांचे लसीकरण झाले.
मुंबईत आजवर एकूण २ कोटी ०३ लाख ७३ हजार ९७७ जणांचे लसीकरण झाले असून यामध्ये ९३ लाख ८४ हजार ७८३ जणांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत, तर १ कोटी ०६ लाख २२ हजार ८०६ जणांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर ३ लाख ६६ हजार ३८५ जणांनी बुस्टर डोस घेतलेला आहे.
Join Our WhatsApp Community