मुंबईत १ मे रोजी केवळ १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे या केंद्रांवर होणार लसीकरण

81

मुंबई महापालिका प्रशासनाला कोविड प्रतिबंधात्मक लसींचा मोजकाच साठा नुकताच प्राप्त झाला आहे. या अनुषंगाने १ मे २०२१ रोजी महापालिकेच्या ५ लसीकरण केंद्रांवर केवळ १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू करण्यात येत आहे. हे लसीकरण केवळ ‘कोविन ॲप’ मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे. तसेच सध्यातरी लसींचा केवळ पहिला डोस घेणाऱ्यांनाच या सुविधेचा लाभ दिला जाणार आहे.

गर्दी न करण्याचे आवाहन

भविष्यात लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल,  त्यानुसार योग्य तो निर्णय त्या-त्या वेळी घेतला जाईल. मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्वच पात्र नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी महापालिका आवश्यक ते सर्व नियोजन करत असून, नागरिकांनी लसीकरण करवून घेण्यासाठी गर्दी करू नये व कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे परिपूर्ण पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे या निमित्ताने पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

इथे होणार लसीकरण

ज्या ५ रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येत आहे त्या पाच रुग्णालयांची नावे पुढील प्रमाणे:

  1. बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).
  2. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)
  3. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).
  4. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).
  5. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.