परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्पेशल लसीकरण: आदित्य ठाकरेंची ती घोषणा हवेतच

त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याकडून एकप्रकारे परदेशी शिकण्यास जाणाऱ्या मुलांची फसवणूक होत असल्याची भावना निर्माण होत आहे.

उच्च शिक्षणासाठी मुंबईतील अनेक विद्यार्थी परदेशात जात असून, त्यांच्यापुढे आता कोविड लसीकरणाची मोठी समस्या निर्माण झाली. विद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील अंतर हे ८४ दिवसांचे असल्याने अनेक मुलांचा विसा रद्द होण्याची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर फिरू लागली आहे. मात्र, हा कालावधी सहा आठवड्यांचा करण्याची घोषणा खुद्द उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे कुठे तरी आशेचा किरण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना दिसू लागला होता. परंतु आयसीएमआरच्या नियमात अद्यापही सुधारणा सुचवली नसल्याने आजही परदेशी जाणाऱ्या मुलांना ८४ दिवस पूर्ण होण्याची प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे या मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.

दुस-या डोसचा प्रश्न

मुंबईतील जी मुले परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाार आहेत, त्यांचे लसीकरण करणे बंधनकारक आहे. परंतु खासगी रुग्णालयांमध्ये अनेक मुलांनी पहिला डोस घेतला असला, तरी दुसरा डोसचा घेण्याचा कालावधी ८४ दिवसांचा असल्याने अनेक मुलांची परवड होत आहे. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांशी चर्चा करुन राजावाडी, कस्तुरबा आणि कुपर रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू केले. या लसीकरणासाठी विद्यार्थ्यांना वैध पुराव्यानिशी म्हणजेच, परदेश प्रवेश मिळाल्याचे निश्चित पत्र, परदेशी व्हिसा, तसेच व्हिसा मिळवण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले आयडी सादर करणे आवश्यक असल्याची अट घालण्यात आली. परंतु प्रत्यक्षात आज खासगी रुग्णालयांमध्ये १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींना लस उपलब्ध हेात असून, प्रश्न आहे तो दुसऱ्या डोसचा.

(हेही वाचाः लसीकरणावरुन राहुल गांधींनी केलं ट्वीट… नेटक-यांनी छेडले ट्विटर वॉर)

आदित्य ठाकरेंकडून फसवणूक?

आयसीएमआरच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार, दोन डोसमधील कालावधी हा ८४ दिवसांचा आहे. हा कालावधी सहा आठवड्यांचा केला जावा, अशी सूचना आदित्य ठाकरे यांनी केली हेाती. यासाठी आयसीएमआरकडे पत्रव्यवहार करण्याच्या सूचनाही महापालिकेला केल्या होत्या. पण आजपर्यंत ही मागणी मान्य झालेली नाही. महापालिकेच्या तीन रुग्णालयांमध्ये या मुलांसाठी लसीकरण केंद्र सुरू केले असले, तरी दुसऱ्या डोसमधील कालावधी कमी न झाल्याने अनेक मुलांमध्ये तसेच त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. महापालिकेच्या तिन्ही रुग्णालयांमध्ये सध्या मुले दुसऱ्या डोससाठी जात असतात. परंतु त्यांना निराश होऊन परतावे लागते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याकडून एकप्रकारे परदेशी शिकण्यास जाणाऱ्या मुलांची फसवणूक होत असल्याची भावना निर्माण होत आहे.

नियमानुसार लसीकरण

महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी अद्यापही परदेशी जाणाऱ्या मुलांच्या दुसऱ्या डोससाठी ८४ दिवसांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे. आयसीएमआरच्या नियमावलीनुसारच सध्या लसीकरण सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचाः राज्यांकडील लसींच्या वितरणाचे अधिकार केंद्राने घेतले काढून !)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here