मुंबईत किशोरवयीन मुलांचे लसीकरण ९ केंद्रात : १ जानेवारीपासून नोंदणी

किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची मोहीम येत्या ३ जानेवारीपासून राबवण्यात येत असून यासाठी मुंबईतील ९ ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. २००७ मध्ये किंवा त्यापूर्वी जन्म झालेल्या मुलांना याचा लाभ घेता येईल. यासाठी येत्या १ जानेवारीपासून ऑनलाईन नाव नोंदणीला सुरुवात होत आहे. यामध्ये केवळ कोवॅक्सिन लस दिली जाणार असल्याचे महापालिका आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

कोवॅक्सिन लस वापराच्या सूचना

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ या आजाराकरीता प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण कार्यक्रमात सुरुवातीला प्राधान्य गट व त्यानंतर १ मे २०२१ पासून १८ वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी महानगरपालिका व शासकीय रुग्णालयात ३०२, खाजगी रुग्णालयात १४९ अशी एकूण ४५१ कोविड १९ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने मुंबई महानगरपालिकेला आतापर्यंत १ कोटी २० लाख ६५ हजार ८३० एवढ्या लसींच्या मात्रा प्राप्त झालेल्या असून, ९९ लाख २४ हजार ७२१ लाभार्थ्यांना (१०७%) पहिली मात्रा व ७९ लाख १७ हजार ७०३ एवढया लाभार्थ्यांना (८६%) दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

मात्र, जागतिक पातळीवर वाढणारी कोविड रुग्णांची संख्या व ओमायक्रोन व्हेरिएंटमुळे कोविड-१९ वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल अँडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) तसेच स्टैंडिंग टेक्निकल सायन्टीफीक कमिटी (STSC) of (NTAGI) यांनी कोविड १९ लसीकरण वाढविण्यासाठी निर्देश दिले असून मुंबईत कोविड-१९ मोहिमेचा महत्वाचा टप्पा कार्यान्वित होत आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यासाठी कोविड १९ वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल अँडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) यांनी केवळ कोवॅक्सिन लस वापराबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

(हेही वाचा २०२१ : राजकीय शह-काटशहचे वर्ष)

लसीकरणसाठी या आहेत मार्गदर्शक सूचना

 • सन २००७ वा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले लाभार्थी हे पात्र राहतील.
 • लाभार्थ्यांना कोविन सिस्टिमवर स्वतःच्या मोबाइल नंबरद्वारे लसीकरणासाठी नोदणी करता येईल.
 • ऑनलाइन सुविधा १ जानेवारी २०२२ पासून सुरू होईल.
 • लसीकरण केंद्राच्या ठिकाणी (onsite) जाऊन नोदणी करण्याचीही सुविधा
 • १५ ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी केंद्रावर फक्त कोवॅक्सिन लसच उपलब्ध असेल याबाबत खबरदारी घ्यावी.
 • ज्या ठिकणी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरु करणे शक्य नसेल अशा ठिकाणी स्वतंत्र रांगा असाव्यात.

मुंबईतील ही आहेत लसीकरण केंद्रे

 • आर.सी. भायखळा कोविड लसीकरण केंद्र
 • सोमय्या जम्बो कोविड लसीकरण केंद्र
 • एनएससीआय डोम, जम्बो कोविड लसीकरण केंद्र
 • बीकेसी जम्बो कोविड लसीकरण केंद्र एच / प
 • नेस्को जम्बो कोविड लसीकरण केंद्र
 • मालाड जम्बो कोविड लसीकरण केंद्र
 • दहीसर जम्बो कोविड लसीकरण केंद्र
 • क्रॉम्प्टन अँड ग्रीव्हस् जम्बो लसीकरण केंद्र
 • आर सी मुलुंड जम्बो कोविड लसीकरण केंद्र

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here