गुजरातच्या वडोदरामध्ये (Vadodara) एका शाळेत मोठी दुर्घटना घडली आहे. मधल्या सुट्टीत मुलं जेवण करत असताना अचानक वर्गाची भिंत कोसळली. त्यामुळे सहा विद्यार्थी बेंचसह पहिल्या माळ्यावरून १० फूट खाली पडले. या घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओदेखील आता समोर आला आहे.
विद्यार्थी बेंचसह १० फूट खाली
वडोदरा शहरातील नारायण विद्यालयात ही घटना घडली. या शाळेत पहिल्या माळ्यावरील एका वर्गात मुलं मध्यल्या सुट्टीत जेवण करत होती. त्यावेळी अचानक वर्गाची भींत कोसळली. या घटनेत सहा विद्यार्थी बेंचसह १० फूट खाली पडले. ही घटना घडताच शाळा प्रशासनाने या घटनेची माहिती अग्नीशमन दलाला दिली. अग्नीशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचत बचावकार्य सुरू केले. तसेच जखमी विद्यार्थांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Vadodara)
गुजरात के वडोदरा में एक निजी स्कूल की दीवार गिरने से आधा दर्जन बच्चों को चोट लग गई। ये हादसा लंच ब्रेक के दौरान हुआ।
हर स्कूल को चलाने के लिए हर साल बिल्डिंग का सेफ़्टी सर्टिफिकेट लेना होता है।
क्या इस स्कूल का सेफ्टी सर्टिफिकेट लिया गया था? pic.twitter.com/Cy60TsD42q— Abhijit Raj (@AbhijitRajINC) July 20, 2024
प्राथमिक तपासात समोर शाळेची इमारत अतिशय जीर्ण अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. तसेच शाळा प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे असल्याचा दावा केला जातो आहे. (Vadodara)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community