Vaishvik Hindu Rashtra Mahotsav : वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवातील प्रस्तावांचे देशपातळीवर बनले कायदे

71
Vaishvik Hindu Rashtra Mahotsav : वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवातील प्रस्तावांचे देशपातळीवर बनले कायदे
Vaishvik Hindu Rashtra Mahotsav : वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवातील प्रस्तावांचे देशपातळीवर बनले कायदे
  • सायली लुकतुके

२४ ते ३० जून या कालावधीत रामनाथी, गोवा येथे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव संपन्न झाले. (Vaishvik Hindu Rashtra Mahotsav) महोत्सवाचे हे १२ वे वर्ष होते. या महोत्सवासाठी देशविदेशांतून हिंदू संघटनांचे ४५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. वर्ष २०१२ मध्ये अखिल भारतीय हिंदू अधिवेशन या नावाने चालू झालेल्या या संमेलनाद्वारे भारतभरातील शेकडो हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्ववादी संघटना संघटित झाल्या आहेत. वर्ष २०११ पासून या महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठ गोरक्षण, गंगारक्षण, लव्ह जिहाद्यांपासून युवतींचे रक्षण, भ्रष्टाचारविरहित सुशासन, पाकिस्तान, बांगलादेश यांसारख्या देशांत अल्पसंख्य असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकरांचे रक्षण यांवर कृतीशील मंथन करत आहेत. या आणि अशा अनेक प्रश्नांवर तोडगा काढावा, यांसारखे प्रस्ताव पारित करून सरकारचे या समस्यांकडे लक्ष वेधत आहेत.

वर्ष २०१४ मध्ये केंद्रात भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर ‘हिंदुत्ववाद’ देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. वर्ष २०१२ मध्ये जेव्हा काँग्रेस सरकार सत्तेत होते आणि देशात पूर्णपणे कथित धर्मनिरपेक्ष वातावरण होते, तेव्हा हिंदू राष्ट्र हा शब्दही उच्चारणे कठीण होते. तेव्हाच्या प्रतिकूल काळात या अधिवेशनाने देशात हिंदू राष्ट्र स्थापन करण्याची आग्रही मागणी केली होती. त्या दिशेने हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठी, कृतीशील रहाण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांची मोटही बांधली होती. २०११ च्या राजकीय आणि सामाजित स्थितीत स्वप्नवत वाटणारे हिंदु राष्ट्र आता दृष्टीपथात आले आहे, हे केवळ हिंदुत्वनिष्ठच नाहीत, तर सामान्य जनताही अनुभवू शकते.

(हेही वाचा – Ashadhi wari 2024: ज्ञानोबा-तुकोबारायांची पालखी पुण्यात मुक्कामी)

गंगारक्षणासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न

केंद्र सरकारने गंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि तिचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नमामी गंगे हे एकात्मिक अभियान हाती घेतले आहे. २०१४ मध्ये मोदी सरकारने गंगा स्वच्छतेसाठी २०१९-२०२० पर्यंत २०,००० कोटी रुपये खर्चाच्या कृती आराखड्याला मंजूरी दिली. महाराष्ट्र सरकारनेही त्याच धर्तीवर नमामी गोदा प्रकल्प हाती घेतला आहे. थोडक्यात गंगा, गोदावरीसह देशातील पवित्र नद्यांच्या पावित्र्य रक्षणाविषयी देशपातळीवर जागृती होऊ लागली आहे. (Vaishvik Hindu Rashtra Mahotsav)

उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा

गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू युवतींचे इस्लामी अत्याचारांपासून रक्षण करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना लव्ह जिहादविरोधी जागृती करत आहेत. तेव्हा ‘प्रेम हे प्रेम असते, प्रेमाला धर्म नसतो’, असे सांगितले जात असे. वर्ष २०१४ मध्येच राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव हिनेच जाहीरपणे ती लव्ह जिहादला बळी पडल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर देशभर लव्ह जिहादविषयी चर्चा छेडली गेली. त्या वेळी एका मोठ्या नेत्याने ‘लव्ह जिहाद काय आहे’, असा प्रश्न केला होता. आता त्याच नेत्याचे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील श्रद्धा वालकर हिची अफताब या तिच्या धर्मांध प्रियकराने निर्घृण हत्या केल्यानंतर महाराष्ट्रातही शासकीय पातळीवर पावले उचलली गेली आहेत. (Vaishvik Hindu Rashtra Mahotsav)

(हेही वाचा – Roads in Border Areas : सीमा भागात 15,520 किमीचे रस्ते नेटवर्क उभारणार; देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारचे उद्दिष्ट)

उत्तराखंड सरकारने केला समान नागरी कायदा

देशातील वाढती लोकसंख्या, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली होणारे मुसलमानांचे तुष्टीकरण, हिंदूंना मिळणारी सापत्न वागणूक यावर तोडगा काढण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ गेली अनेक वर्षे समान नागरी कायद्याची मागणी करत आहेत. गेल्याच वर्षी उत्तराखंड सरकारने समान नागरी कायदा केला आहे. आता तो एकाच राज्यापुरता मर्यादित असला, तरीही देशपातळीवरील कायद्याचे बीजच एकप्रकारे रोवले गेले आहे. हिंदुत्वनिष्ठांनी निरनिराळ्या व्यासपीठावर केलेल्या मागण्यांची शासकीय पातळीवर घेतली गेलेली ही दखलच आहे. (Vaishvik Hindu Rashtra Mahotsav)

नागरिकत्व सुधारणा विधेयक हे हिंदूंच्या मागणीला यश

२०१९ मध्ये सरकारने आणलेले नागरिकत्व सुधारणा विधेयक हे हिंदुत्वनिष्ठांच्या मागणीला मिळालेले यश आहे. पाकिस्तान, बांगलादेशसारख्या देशांतील अल्पसंख्य हिंदूंना अभय द्यावे, यासाठी अनेक हिंदुत्वनिष्ठ प्रयत्न करत होते. सीएए कायदा झाल्यामुळे त्याही हिंदूंना आता निवारा मिळणार आहे.

(हेही वाचा – Sitabuldi Fort: नागपूरच्या सीताबर्डी किल्ल्याचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्यायचं आहे? ही माहिती अवश्य वाचा)

बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमानांची घुसखोरी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या यांविषयीही अनेक अधिवेशनांमध्ये उहापोह झाला आहे. घुसखोरीच्या समस्येच्या विरोधात काम करणारे राष्ट्रप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ अनेक वर्षांपासून त्याविरोधात तोडगा काढण्याची मागणी करत होते. एनआरसी कायद्यामध्ये त्याचीही तरतूद आहे.

अशा प्रकारे तळमळीने कार्य करणाऱ्या हिंदूंच्या प्रयत्नांची कळत-नकळत दखल घेतली जात आहे. या काही ठळक आणि बोलक्या उदाहरणांतूनच स्पष्ट होते की, वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव हा राष्ट्र, धर्म आणि समाज यांवर होणाऱ्या आघातांना वाचा फोडणारा एक बुलंद आवाज ठरला आहे. एक एक मागणी पूर्ण होतांना आपली हिंदू राष्ट्राकडेही वेगाने वाटचाल चालू आहे. हेच देश, धर्म आणि समाज यांच्या कल्याणासाठी तळमळीने, तसेच निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या या हिंदू संघटनामुळेच एक दिवस हिंदू राष्ट्राची पहाटही पाहायला मिळणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.