नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhas Chandra Bose) यांच्या जयंतीनिमित्त ‘पराक्रम दिन’ साजरा केला जातो. त्यादिवशी ‘नॅशनल अवॉर्ड ऑफ एक्सलन्स, इंडिया’ या विशेष सोहळ्याचे आयोजन केले जात असते. या सोहळ्यात भारतीय सैन्य, नौदल, हवाई दल, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल, एनसीसी अधिकारी आणि समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अन्य मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे.
(हेही वाचा : MHADA Konkan Mandal : २१४७ सदनिका व ११० भूखंड विक्रीसाठी ०५ फेब्रुवारीला संगणकीय सोडत)
वॅलियंट फेम आयकॉन (VFI) आणि जिल्हा सैनिक वेलफेअर (ZSW) यांच्या सहकार्याने आयोजित हा कार्यक्रम दि.२८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत वीर सावरकर हॉल, शिवाजी पार्क, दादर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी सैनिकी कल्याण व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू सोमनाथ बोस (Somnath Bose) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात देशभक्त नागरिकांना कोणत्याही प्रवेश शुल्काशिवाय उपस्थित राहता येणार असल्याची माहिती ‘वॅलियंट फेम आयकॉन’च्या संपूर्ण टीमकडून देण्यात आली. (Netaji Subhas Chandra Bose)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community