कसारा घाटात कोसळली दरड !

दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

महामुंबईत परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून पावसामुळे मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी तेथे दरड कोसळली, तशीच सोमवारी पहाटे ५ वाजता कसारा घाटात दरड कोसळली. त्यामुळे घटनास्थळी रेल्वेची आपत्कालीन सहायता टीम, आरपीएफ कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अप व डाउन मार्गाची वाहतूक धीम्या गतीने सुरु असून सर्व प्रकारच्या गाड्या एक ते दीड तास उशिराने धावत आहेत. दरड हटविण्याचे काम येथे युद्ध पातळीवर सुरू आहे.

(हेही वाचा : महामुंबईला पावसाचा धोका कायम! पुन्हा जमले काळे ढग!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here