मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच झाली, असा आरोप होत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला 21 दिवस झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या मारेकऱ्यांना आणि हत्येच्या सूत्रधाराला पकडण्यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. वाल्मिक कराड यांच्यावर बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी दिल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून वाल्मिक कराड (Valmik Karad) फरार आहेत. अद्याप ही त्यांच्या कोणताही पत्ता तपास यंत्रणांना मिळालेला नाही.
(हेही वाचा – China Dam : ब्रह्मपुत्रा नदीवर चीन बांधणार जगातील सर्वांत मोठे धरण; भारतासाठी मोठा धोका, चीनचे स्पष्टीकरण)
24 तासाच्या आत वाल्मिक कराड हे पोलिसांना शरण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाल्मीक कराड यांच्यावर पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मीक कराड अटक होणार का, याची चर्चा सुरू आहे. तर काही वृत्तवाहिन्यांवर वाल्मिक कराडला अटक झाली, असेही वृत्त प्रसारित होत आहे. ‘न्यूज १८ लोकमत’ने हे वृत्त खोटे असल्याचा दावा केला आहे. वाल्मिक कराड अद्याप फरारच आहे, असे वृत्त ‘न्यूज १८ लोकमत’ने दिले आहे. यासंदर्भात सीआयडी तपासाला वेग आला असून लवकरच पोलिसांचे अधिकृत स्टेटमेंट समोर येणार आहे.
वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचा मोबाईल 13 डिसेंबरपर्यंत सुरूच होता. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन हे देखील मध्य प्रदेशात दिसल्याचे यंत्रणांच्या तपासात समोर आले आहे. 11 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मध्यप्रदेशातील श्री क्षेत्र उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याचे फोटो त्यांच्याच फेसबुक अकाउंटवर पोस्ट करण्यात आले आहेत. एकूण 9 सीआयडी पथके संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मारेकऱ्यांचा तपास करत आहेत. आतापर्यंत सीआयडीकडून वाल्मिक कराड यांच्या निकटवर्तीयांची चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांच्या फरार मारेकऱ्यांची बँक खाती गोठवली आहेत. तसेच या सर्वांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community