चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सरळ लढत होणार होती. इथे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे हे निवडणुकीत उभे असून ते महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे घोषित झाले आहे. मात्र या ठिकाणी ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी घेतल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली असताना आता ठाकरे गटासोबत युती केलेल्या वंचित बहुजन आघाडीने थेट ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केल्याने राष्ट्रवादीची आणखी डोकेदुखी वाढली आहे.
वंचित बहुजन आघाडीने पत्रक काढून दिला पाठिंबा
त्याबाबच पत्रक काढून वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली आहे. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. खरे म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून अश्विनी जगताप तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकूणच राहुल कलाटे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी स्वतः उद्धव ठाकरे, अजित पवार, सचिन अहिर या नेत्यांनी विनंती केली होती. मात्र, राहुल कलाटे यांनी निवडणुकीतून माघार न घेता आता वंचितचा पाठिंबा मिळवला आहे. राहुल कलाटे यांनी वंचित बहुजन आघाडीकडे पाठिंबा मागितला होता. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीने तो पाठिंबा पत्रक काढून दिला आहे. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आहे आणि त्यात ठाकरे यांच्यासोबत वंचितची युती आहे.
(हेही वाचा नैसर्गिक आपत्तींचा पूर्व अंदाज घ्यायला शिकायचे, तर ही संधी सोडू नका, ISRO चा येतोय मोफत कोर्स)
Join Our WhatsApp Community