अश्‍लील प्रकार चालणाऱ्या अनधिकृत Cafe ची श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड

राज्यात बर्‍याच जिल्ह्यांत अनधिकृत कॅफेत अश्‍लील प्रकार चालू आहेत. आतापर्यंत मी शासनाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर नाशिक, धुळे, बुलढाणा, पुणे, कोल्हापूर येथे प्रशासनाने या अनधिकृत कॅफेवर कारवाई केली, असे नितीन चौगुले म्हणाले म्हणाले.

216
शहरातील विश्रामबाग परिसरातील ३ अनधिकृत कॅफेत (Cafe) अनेक वर्षांपासून अश्‍लील चाळे असल्याचा आरोप करत १७ मे या दिवशी सकाळी ११.३० वाजता येथील श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी ३ अनधिकृत कॅफेत दगडफेक करत कॅफेचे फर्निचर आणि साहित्य यांची तोडफोड केली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या १५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. सनशाईन, डेनीस्को आणि आणखी एका कॅफेची तोडफोड करण्यात आली आहे.
अचानक झालेल्या तोडफोडीमुळे शहरातील कॅफे मालकांचे धाबे दणाणले असून विश्रामबाग परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
शहरातील विश्रामबाग परिसरातील ३ अनधिकृत कॅफेत (Cafe) अनेक वर्षांपासून अश्‍लील प्रकार चालू होते. या संदर्भात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने महापालिका प्रशासन आणि पोलीस अधिकारी यांना वेळोवेळी भेटून निवेदनाद्वारे याची माहिती देऊन अनधिकृत कॅफेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र याकडे महापालिका प्रशासन आणि पोलीस अधिकारी यांनी सोयीस्कररीत्या कानाडोळा केला. त्यामुळे सरतेशेवटी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी अनधिकृत कॅफेची तोडफोड केली. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव’च्या घोषणा दिल्या.

तर राज्यभर आंदोलन करणार 

या संदर्भात पत्रकारांशी बोलतांना नितीन चौगुले म्हणाले, ‘‘राज्यात बर्‍याच जिल्ह्यांत अनधिकृत कॅफेत अश्‍लील प्रकार चालू आहेत. आतापर्यंत मी शासनाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर नाशिक, धुळे, बुलढाणा, पुणे, कोल्हापूर येथे प्रशासनाने या अनधिकृत कॅफेवर कारवाई केली आहे; मात्र सांगली येथे वारंवार निवेदन देऊनही महापालिका प्रशासन आणि पोलीस यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे पोलिसांनी अनधिकृत ‘कॅफे’वर (Cafe) कारवाई न केल्यास आमच्या संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी त्यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘अनधिकृत कॅफेवर कारवाईसाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे. २८ एप्रिल या दिवशी एका ‘कॅफे’मध्ये अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन नंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीने पोलीस ठाण्यात तक्रार करूनही पोलिसांनी दोषींवर कारवाई केली नाही. २ दिवसांपूर्वी या प्रकरणी आरोपींच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘कॅफे’मध्ये अश्‍लील चाळे होत असून मुलींचे शोषण होत आहे. या प्रकरणात कॅफे मालकांवरही गुन्हा नोंद करावा, अशी मागणी केली आहे.

असा चालतो ‘कॅफे’मध्ये अश्‍लील प्रकार…

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या एका कार्यकर्त्यांने स्वतः जोडप्याला घेऊन अनधिकृत कॅफेत अश्‍लील चाळे चालू असल्याचा भांडाफोड केला. एका कॅफेत ‘कॉफी मिळते का ?’ अशी चौकशी केल्यावर कामगाराने ‘येथे कॉफी नाही’, असे सांगितले. त्यानंतर जोडप्याला ‘कॅफे’मधील (Cafe) एका खोलीत जाऊन अश्‍लील चाळे करण्यासाठी खोली उपलब्ध असल्याचे कामगाराने सांगितले. त्या खोलीत राहून अश्‍लील चाळे करण्यासाठी जोडप्याकडून प्रति घंटा ३०० रुपये घेतले जातात. या अनधिकृत कॅफेत जोडपी बसतील अशा छोट्या खोल्या आहेत. विशेष म्हणजे अवघ्या हाकेच्या अंतरावर असणार्‍या विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात हा प्रकार सर्रास चालत आहे. याची माहिती असतांनाही पोलीस जाणीवपूर्वक कारवाई करत नाहीत, असा आरोप श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.