वंदे भारतमध्ये निकृष्ट जेवण; ट्विटरवर व्हिडिओ व्हायरल, IRCTC कडून चौकशीचे आदेश

152

रेल्वेने आपण अनेकवेळा प्रवास करतो. अलिकडे प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणताही वाईट अनुभव आला तर लगेच यासंदर्भात रेल्वेकडे किंवा ट्विटरवर रेल्वेला टॅग करत तक्रार करण्यात येते. असाच व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. वंदे भारत रेल्वेमधील निकृष्ट जेवणाचा व्हिडिओ व्हायरल होत असून यावर प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

( हेही वाचा : मराठा आरक्षणासाठी एकजुटीने लढा देऊ! न्यायालयीन लढ्यासाठी टास्क फोर्स स्थापन करणार)

ट्विटरवर व्हिडिओ व्हायरल

वंदे भारत ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नामधून चक्क तेल निघताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेच. या जेवणाच्या ताटासाठी अतिरिक्त पैसे आकारले जात असताना असे निकृष्ट अन्न दिले जात आहे अशी तक्रार करण्यात येत आहे. ग्राहकांना दिलेल्या वडा आणि समोशातून तेल गळताना दिसत आहे. यासंदर्भात एका प्रवाशाने ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे.

IRCTC कडून चौकशीचे आदेश 

याची IRCTC कडून दखल घेण्यात आली आहे. प्रवाशांनी केलेल्या तक्रारीवर IRCTC ने उत्तर दिले असून यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवाशांनी ट्रेनमधून प्रवास करताना आपापले खाद्यपदार्थ सोबत न्यायले हवे अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर आल्या आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.