बहुप्रतिक्षित अशा वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी चाचणी अहमदाबाद ते मुंबई दरम्यान शुक्रवारी पूर्ण झाली. अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल असे एकूण 493 किलोमीटरचे अंतर या एक्सप्रेसने अवघ्या सव्वा पाच तासांत पूर्ण केले. या यशस्वी चाचणीमुळे ऑक्टोबर 2022 नंतर ही गाडी पश्चिम रेल्वेवर प्रवाशांसाठी धावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
असा झाला प्रवास
वंदे भारत एक्सप्रेस शुक्रवारी सकाळी 7 वाजून 6 मिनिटांनी अहमदाबाद स्थानकातून मुंबईच्या दिशेने रवाना झाली आणि दुपारी 12 वाजून 19 मिनिटांनी ती मुंबई सेंट्रल स्थानकात दाखल झाली. दुपारी 1 वाजून 9 मिनिटांनी या गाडीचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि संध्याकाळी 6 च्या सुमारास ही गाडी अहमदाबाद रेल्वे स्थानकात पोहोचली. या यशस्वी चाचणीनंतर मुंबई ते अहमदाबाद प्रवास जलद होणार असून, एकूण साडे पाच तासांत ही गाडी हे अंतर कापेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
(हेही वाचाः EPFO: रोजंदारी करणा-या मजूरांनाही मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन, काय आहे योजना?)
लवकरच सुरू होणार सेवा
या गाडीचा ताशी वेग साधारणपणे 130 ते 180 किमी असून या गाडीला चार संचांमध्ये चार इंजिन आहेत. ईएमयू पद्धतीचे हे चार संच आहेत. तीन वर्षांपूर्वी ही गाडी उत्तर भारतातील प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली होती. आता ऑक्टोबर 2022 नंतर ही गाडी मुंबई ते अहमदाबाद अशी जलद सेवा पुरवणार आहे. या गाडीला विमानाप्रमाणे आरामदायी सरकरणा-या खुर्च्या असून 16 डब्यांच्या या गाडीची लांबी जवळपास 384 मीटर इतकी आहे.
Join Our WhatsApp Community