पुण्याच्या ट्रॅकवर अखेर वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) धावणार आहे. रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यावर पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस १५ सप्टेंबरपासून धावणार आहे. या रेल्वेला आठ डबे असून, वंदे भारत एक्सप्रेसची ही अद्ययावत गाडी असणार आहे.
(हेही वाचा – Rajkot Fort : राजकोट पुतळा प्रकरणी जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी)
धारवाड, बेळगाव, कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा व कराड या स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आला. पुणे स्थानकावर सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी उद्घाटन सोहळा होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. पुणेकर दीड ते दोन वर्षांपासून पुण्याहून वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरू होण्याची वाट पाहत होते. पुणे-हुबळीच्या निमित्ताने ही मागणी पूर्ण होत आहे. मात्र, ही रेल्वे पुणे विभागाची नसून, हुबळी विभागाची असणार आहे. त्यामुळे याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी हुबळी विभागाची असणार आहे. पुण्यात वंदे भारत एक्सप्रेस दाखल झाल्यावर डब्यांची स्वच्छता केली जाईल.
(हेही वाचा – Manipur मधील तीन जिल्ह्यांत कर्फ्यू)
ही वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) हुबळी स्थानकावरून पहाटे पाचच्या सुमारास सुटेल. मिरजला सकाळी नऊ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन कोल्हापूरला १० वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल. कोल्हापूरला १५ मिनिटांचा थांबा आहे. १० वाजून ३० मिनिटांनी कोल्हापूरहून सुटेल अन् पुन्हा मिरजला सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी येईल. दुपारी चारच्या सुमारास पुण्याला पोहोचेल. पुण्याहून दुपारी ४ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल. मिरजला नऊ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. हुबळीला रात्री एक वाजून ५० मिनिटांनी पोहोचणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community