Vande Bharat Manufactured in Latur : लातूरमध्ये होणार ‘वंदे भारत’ची निर्मिती; फडणवीसांनी दिली माहिती

महाराष्ट्रातील सहावी वंदे भारत रेल्वे जालन्यातून धावत असून, ही जालनाच नव्हे तर मराठवाड्यासाठी आनंदाची बाब आहे. यापुढे लातूर येथील कोच फॅक्ट्रीत वंदे भारत ट्रेनची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

247
Vande Bharat Manufactured in Latur : लातूरमध्ये होणार 'वंदे भारत'ची निर्मिती; फडणवीसांनी दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार ३० डिसेंबर रोजी श्री क्षेत्र अयोध्या येथून ऑनलाईन पद्धतीने जालना ते मुंबई या मार्गावरील (Vande Bharat Manufactured in Latur) वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवत या रेल्वे सेवेचे लोकार्पण केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालना येथील कार्यक्रमात सहभागी झाले. तसेच या रेल्वेतून त्यांनी जालना ते छत्रपती संभाजीनगर असाप्रवास देखील केला.

उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, व अन्य मान्यवर देखील उपस्थित होते. यावेळी फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

(हेही वाचा – Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगाटने रस्त्यावरच ठेवला अर्जुन पुरस्कार)

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

जालना व मराठवाडा वासियांसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. महाराष्ट्रात सध्या ६ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat Manufactured in Latur) सुरू झाल्या आहेत. जालना येथून आज वंदे भारत ही आधुनिक भारताची ट्रेन सुरु केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप आभार मानतो. या रेल्वेमुळे केवळ मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगर ही शहरे मुंबईशी जोडली जाणार नसून मनमाड, नाशिक ही शहरे देखील वंदे भारत रेल्वेमुळे मुंबईशी जोडली जाणार आहे. सध्या १६० कि.मी प्रति तास धावणारी ही ट्रेन (Vande Bharat Manufactured in Latur) दोन वर्षात २५० कि.मी प्रति तास धावेल. या रेल्वेमुळे मराठवाड्यातील उद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे.

(हेही वाचा – Siddhivinayak Temple : नवीन वर्षाची सुरुवात सिद्धिविनायकाच्या दर्शनाने करायची आहे; जाणून घ्या काय आहे मुखदर्शनाची वेळ)

लातूरमध्ये होणार वंदे भारतची निर्मिती –

महाराष्ट्रामध्ये ₹१ लाख ६ हजार कोटींची रेल्वेची कामे सुरु असून यावर्षी आपल्याला ₹१३ हजार कोटी मिळाले आहेत. या माध्यमातून राज्यामध्ये अनेक रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणाचे काम सुरु आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची ही ट्रेन पुढील काळात लातूर (Vande Bharat Manufactured in Latur) येथील कोच फॅक्टरीमध्ये बनविण्यात येणार आहे. लातूर व मराठवाड्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी घेतलेला विकसित भारताचा संकल्प पूर्ण होण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस ही मैलाचा दगड ठरणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.