- ऋजुता लुकतुके
वंदे भारत रेल्वे डबे अल्पावधीतच त्यांचं डिझाईन आणि कामगिरीमुळे लोकप्रिय झाले आहेत. आता वंदे भारत स्लिपर कोच कसा असेल याचा एक व्हिडिओ हे डबे बनवणाऱ्या इंटिग्रल कोच फॅक्टरीने लोकांसमोर आणला आहे. १५ जानेवारीपर्यंत पहिला वंदे भारत स्लिपर कोच वापरासाठी तयार होईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
‘सध्या भारतात ट्रेनची मागणी इतकी जास्त आहे की आम्ही पुढील ३ ते ४ वर्ष देशांतर्गत मागणीच पूर्ण करू शकणार आहोत. पण, त्यानंतर हे कोच निर्यात करण्याचाही आमचा मानस आहे, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं.
आतापर्यंत वंदे भारत रेल्वे डबे हे फक्त चेअर कार म्हणून बसून प्रवास करायचे होते. पण, रेल्वे मंत्रालयाच्या विनंतीवरून कंपनीने स्लिपर कोचचं डिझाईनही तयार केलं आहे. (Vande Bharat Sleeper Coach)
(हेही वाचा – आम्हाला शांतता हवी; इंडोनेशियात Rohingya Muslims ना विरोध)
GOOD AFTERNOON 💙
New Vande Bharat Sleeper Coaches are ready to roll out. Manufactured in ICF, Chennai. pic.twitter.com/mV1B7yNwQL
— Filmy Fanatic (@FanaticFilmy) October 24, 2024
यापूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावर्षी १ सप्टेंबर रोजी वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या पहिल्या मॉडेलची झलक दाखवली होती. ते बेंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडच्या कारखान्यात ट्रेनची पाहणी करण्यासाठी आले होते.
यादरम्यान ते म्हणाले होते की, वंदे भारत स्लीपर ट्रेन ८०० ते १२०० किलोमीटर अंतराचा प्रवास करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. रात्री १० च्या सुमारास प्रवासी त्यात चढतील आणि सकाळी त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील. ही ट्रेन मध्यमवर्गीयांसाठी बनवण्यात आली आहे. तिचे भाडे राजधानीइतकेच असेल.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, ट्रेनमध्ये कपलर मेकॅनिझमचे नवीन तंत्रज्ञान आणले आहे. यामुळे ट्रेनचे वजन कमी होते आणि तिची ताकद वाढते. दोन डब्यांना जोडणारा भाग म्हणजे कपलर. हे ऑस्टेनिटिक स्टीलचे बनलेले आहे. (Vande Bharat Sleeper Coach)
(हेही वाचा – निवडणुकीच्या तोंडावर Ajit Pawar यांना मोठा दिलासा; घड्याळ चिन्ह वापरता येणार)
रेल्वेमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रेन बनवताना वजनाचा समतोल आणि स्थिरता लक्षात घेण्यात आली आहे. चाक आणि ट्रॅक यांच्यातील यांत्रिक भागाची खास रचना करण्यात आली आहे. यामुळे ट्रेनमधील कंपन आणि आवाज कमी होईल.
वंदे भारत स्लीपर ट्रेनची गणना जगातील सर्वोत्तम ट्रेनमध्ये केली जाईल, असा दावा अश्विनी वैष्णव यांनी केला. ट्रेनचे डबे आणि टॉयलेट अपग्रेड करण्यात आले आहेत. ट्रेनमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स आहेत. देखभाल कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन बांधण्यात आली आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केल्यामुळे, भारतीय रेल्वेचा लांब पल्ल्याच्या प्रवासाचा वेळ कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. विशेषत: दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता या लांब मार्गांवर प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. मात्र ही गाडी कोणत्या मार्गावर धावणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Vande Bharat Sleeper Coach)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community