गेल्या काही काळापासून देशभरात वंदे भारत ट्रेनची संख्या वाढत आहे. ही देशातील सर्वात आधुनिक ट्रेन असून, यात प्रवाशांना अनेक सुविधा मिळतात. विशेष म्हणजे, या ट्रेनमध्ये थोडीदेखील गर्दी पाहायला मिळत नाही. जेवढे सीट, तेवढेच प्रवासी प्रवास करू शकतात. पण सध्या वंदे भारत ट्रेनमधला एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडियोमध्ये विना तिकीट प्रवासी वंदे भारतमध्ये शिरल्याचे दिसत आहे. (Vande Bharat train)
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म “X”वर @IndianTechGuide नावाच्या अकाउंटवरून विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अवघ्या ५ सेकंदाचा असला, तरी सोशल मीडियावर या व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओमध्ये वंदे भारत ट्रेनच्या डब्यात विनातिकीट प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला, तेव्हा ट्रेन लखनऊमध्ये उभी होती. म्हणजेच ही सर्व गर्दी लखनऊ स्टेशनवरून चढलेली असू शकते, असे या व्हिडिओबद्दल म्हटले जात आहे. (Vande Bharat train)
🚨 Vande Bharat train occupied by ticketless passengers at Lucknow.
(📷-@architnagar) pic.twitter.com/ZnkQFr5iJs
— Indian Tech & Infra (@IndianTechGuide) June 11, 2024
प्रवाशांना दंड ठोठावण्याची मागणी
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत १.३ मिलियन म्हणजेच १३ लाख वेळा पाहिला गेला आहे, तर १७ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक करून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर काही प्रवासी संतापले असून, त्यांनी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड ठोठावण्याची मागणी केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेकडूनही उत्तर आले. सोशल मीडियावरील या पोस्टला उत्तर देताना रेल्वेने म्हटले आहे की, संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्यात येत आहे. आम्ही सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करू.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community