- ऋजुता लुकतुके
वंदे भारत रेल्वे (Vande Bharat Train) दिवसंदिवस लोकांमध्ये अधिक लोकप्रिय होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात लोक दररोज वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करत आहेत. वंदे भारतमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा लोकांच्या पसंतीस पडत आहेत. दरम्यान, वंदे भारत ट्रेनने किती कमाई केली आहे, याबाबतची माहिती तुम्हाला माहित आहे का? रेल्वे प्रशासनाने वंदे भारत ट्रेनच्या कमाईबद्दल नेमकं काय म्हटलं आहे, याबाबतची माहिती पाहुयात. (Vande Bharat Train)
भारतीय रेल्वे विभागाला वंदे भारत या ट्रेनमधून मोठं उत्पन्न मिळालं आहे. मध्य प्रदेशातील रहिवासी चंद्रशेखर गौर यांनी आरटीआय कायद्यानुसार, वंदे भारत ट्रेनचे उत्पन्न किती? याबाबतची माहिती विचारली होती. यावर रेल्वे विभागानं उत्तर दिले आहे. रेल्वे प्रशासन वंदे ट्रेनमधून होणाऱ्या कमाईचे वेगळे रेकॉर्ड रेल्वे प्रशासन ठेवत नाही. त्यामुळं रेल्वे प्रशासन याबाबतची माहिती देऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे. (Vande Bharat Train)
(हेही वाचा – Deep Cleaning : गगराणी यांनी ठेवले सफाई कामगारांच्या खांद्यावर हात, मिळवले कामगारांच्या हृदयात स्थान)
‘या’ तारखेपासून सुरु झाली होती वंदे भारत ट्रेन
दरम्यान, रेल्वे विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत २ कोटीहून अधिक लोकांनी वंदे भारत ट्रेनने प्रवास केला आहे. वंदे भारत ट्रेनने ३१० वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा होईल एवढे अंतर वर्षभरात पार केले आहे. दरम्यान, या माहितीनंतर आरटीआय दाखल केलेले चंद्रशेखर गौर यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. रेल्वे विभाग प्रवास करणाऱ्या लोकांची माहिती तसेच रेल्वेने किती अंतर पार केले याबाबतची माहिती दिली आहे. मात्र, किती उत्पन्न झालं याबाबतची माहिती का दिली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Vande Bharat Train)
वंदे भारत ट्रेन ही देशातील पहिली सेमी-हाय स्पीड नवीन जनरेशन ट्रेन आहे. त्यामुळं या रेल्वेच्या कमाईची माहिती ठेवणं गरजेचं आहे. या रेल्वेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं यासंदर्भातील माहिती ठेवणं गरजेचं असल्याची माहिती चंद्रशेखर गौर यांनी दिली आहे. दरम्यान, १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान, पहिली ट्रेन सुरु झाली होती. आत्तापर्यंत १०२ वंदे भारत ट्रेन सुरु झाल्या आहेत. ही ट्रेन २४ राज्ये आणि २८४ जिल्ह्यांमधून १०० मार्गांवर प्रवास करते. (Vande Bharat Train)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community