Vande Bharat Train: ‘वंदे भारत’ने प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय, जाणून घ्या

उन्हाचा तडका लक्षात घेता प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

195
Vande Bharat Train: 'वंदे भारत'ने प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने घेतला 'हा' निर्णय, जाणून घ्या

उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक प्रवासी गावी जातात. मे महिन्यात तर, उन्हाळी सुट्टीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. या दिवसांत जे प्रवासी वंदे भारत ट्रेनने प्रवास करणार आहेत. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. (Vande Bharat Train)

पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि उन्हाचा तडका लक्षात घेता प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ५०० मिली पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. (Vande Bharat Train)

(हेही वाचा – Weather Department: मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट, पुण्यात विजांच्या कडकडाटांसह पाऊस; हवामान खात्याचा इशारा)

कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय…
उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार म्हणाले की, रेल्वे सर्व वंदे भारत ट्रेनमधील प्रत्येक प्रवाशाला सीटवर अर्धा लिटर रेल्वे नीर पॅकेज्ड पेयजल (PDW) बाटली प्रदान केली जाईल. त्यानंतर मागणीनुसार, प्रवाशांना ५०० मिली.ची दुसरी रेल नीरची पॅकेज्ड बाटली कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय प्रदान केली जाईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.