Vande Bharat Train : वंदे भारत ट्रेनमधून आतापर्यंत २ कोटी लोकांनी केला प्रवास 

Vande Bharat Train : २०१९ मध्ये दिल्ली ते वाराणसी दरम्यान पहिली वंदे मातरम ट्रेन धावली होती

179
देशात पहिल्यांदाच 20 डब्यांची Vande Bharat train धावणार; मोदी दाखवणार हिरवा झेंडा
  • ऋजुता लुकतुके

भारतीय बनावटीची पहिली सेमी हाय-स्पीड ट्रेन असलेल्या वंदे भारतने एक मोठा पल्ला गाठला आहे. २०१९ पासून पुढच्या पाच वर्षांत या ट्रेनने २ कोटी प्रवाशांचा आकडा गाठला आहे. पीटीआयने या विषयीची बातमी दिली आहे. २०१९ मध्ये दिल्ली ते वाराणसी या मार्गावर पहिली वंदे भारत ट्रेन धावली होती. भारतीय रेल्वेनंच (Indian Railway) या ट्रेन विकसित केल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय रेल्वेलाही आता १७१ वर्ष पूर्ण झाली आहेत. (Vande Bharat Train)

(हेही वाचा- Eknath Shinde: महायुतीमध्ये शिवसेना किती जागांवर लढणार? अखेर मुख्यमंत्र्यांनी आकडा सांगितला)

पहिली ट्रेन १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे (Mumbai to Thane) दरम्यान धावली होती. २०१९ मध्ये पहिली भारतीय बनावटीची ट्रेन म्हणून वंदे भारत लोकांसमोर आली. आतापर्यंत या ट्रेनचा विस्तारही करण्यात आला आहे. जवळ जवळ १०० मार्गांवर ही ट्रेन भारतात धावते आहे. २४ राज्यांत २८४ जिल्ह्यातून वंदे भारत ट्रेन प्रवास करते. वंदे भारत ही भारतातील पहिली सेमी हाय-स्पीड, सुरक्षेच्या बाबतीत आधुनिक आणि सेवांच्या बाबतीत प्रिमिअम रेल्वे सेवा आहे. (Vande Bharat Train)

(हेही वाचा- IPL 2024, Dinesh Karthik : दिनेश कार्तिकला हवी टी-२० विश्वचषक संघात जागा )

सध्याच्या वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Train) या सिटिंग म्हणजे फक्त बसण्याची सोय असलेल्या ट्रेन आहेत. पण, भारतीय रेल्वेला लवकरच वंदे भारत स्लिपर कोच आणायचे आहेत. त्यामुळे रात्रीचा प्रवास सोपा होणार आहे. तर मेट्रो मार्गिकांसाठीही वंदे भारत कोच विकसित करण्याचं उद्दिष्टं भारतीय रेल्वेनं ठेवलं आहे. (Vande Bharat Train)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.