वंदे भारत ट्रेनने (Vande Bharat Train) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढणार आहे. मुंबई ते गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस सुस्साट धावणार आहे. पश्चिम रेल्वे पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकी सुधारणा करत आहे. त्या सुधारणांचा अंतिम टप्पा आला आहे.
वंदे भारत प्रवासाचा वेळ २५ ते ३० मिनिटे कमी होणार आहे तसेच मुंबईवरून आणखी एक वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या देशभरातून ८२ ठिकाणांवरून वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत. अनेक शहरांमधून या ट्रेन सुरू करण्याची मागणी होत आहे. या वर्षअखेर दोनशेपेक्षा जास्त ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.
‘हे’ होणार बदल
सध्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर वंदे भारत ट्रेनला जवळपास 5.15 तास तर शताब्दी ट्रेनला 6.35 तास लागतात. वेग वाढल्यानंतर 30 मिनिटे कमी होणार आहे. सध्या विरार आणि चर्चगेट दरम्यान वंदे भारत 100-110 किमीप्रति तास वेगाने धावते. या गाडीचा वेग 160 किमी वाढल्यानंतर 30 मिनिटे वाचणार आहे. मार्च 2024 पासून मुंबई आणि गांधीनगर दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. कारण पश्चिम रेल्वे पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकी सुधारणा करत आहे. त्या सुधारणांचा अंतिम टप्पा आला आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ट्रेनला 160 किमी प्रतितास वेगाने धावण्याची परवानगी मिळणार आहे. सध्या 110 किमी वेगाने ही ट्रेन धावत आहे. परंतु लवकरच 160 किमी प्रतितास वेगाने वंदे भारत आणि शताब्दी ट्रेन धावणार आहे.
मुंबईसाठी आणखी एक ‘वंदे भारत’
राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते गांधीनगर (अहमदाबाद), नागपूर ते बिलासपुर, इंदूर ते नागपूर आणि मुंबई ते गोवा या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. आता दक्षिण कन्नडचे खासदार नलिन कुमार कटील यांनी रेल्वे मंत्र्यांकडे नवीन मागणी केली आहे. मंगळुरू सेंट्रल ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मुंबईपर्यंत नेण्याची विनंती केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही विनंती मान्य केल्यास मुंबईला आणखी एक वंदे भारत मिळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community