Vande Sadharan Express: सामन्यासाठी ‘वंदे साधारण’ एक्स्प्रेस

वंदे भारत’ला प्रवाशांची पसंती, मात्र प्रवास खर्चिक

175
Vande Sadharan Express: सामन्यासाठी 'वंदे साधारण एक्स्प्रेस
Vande Sadharan Express: सामन्यासाठी 'वंदे साधारण एक्स्प्रेस

देशातील सेमी हायस्पीड ट्रेन ‘वंदे भारत’ला प्रवाशांची पसंती मिळत आहे. मात्र हा प्रवास खर्चिक होता; परंतु सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी वंदे साधारण ट्रेन तयार केली आहे. ही गाडी चेन्नईच्या आयसीएफ फॅक्टरीतून चाचणीसाठी बाहेर पडली असून, ती मुंबईत मध्य रेल्वेच्या वाडीबंदर यार्डात शनिवारी रात्री दाखल झाली. आवश्यक त्या तपासण्या केल्यानंतर मुंबई-पुणे आणि कसारा-इगतपुरी या घाटमार्गावर तिच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. (Vande Sadharan Express)

वंदे भारतच्या धर्तीवर बनवण्यात आलेली ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेली सुपरफास्ट नॉन एसी एक्सप्रेस आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यापासून उच्च आणि मध्यमवर्गीय प्रवाशांच्या पसंतीस उतरली मात्र गरीब आणि सर्वसाधारण प्रवाशांसाठी देखील त्याच दर्जाच्या सोयी आणि सुविधांसह कमी किमतीत प्रवास करण्यासाठी वंदे साधारण एक्सप्रेस बनवण्यात आली आहे. या एक्सप्रेसमध्ये पुश पुल टेक्नॉलॉजी असलेले दोन इंजिन पुढे आणि मागे लावण्यात आलेले आहेत. एक्सप्रेसमध्ये १२ स्लीपर नॉन एसी कोच, आठ जनरल कोच, आणि दोन कोच असणार आहेत.

अशी आहे गाडी

  •  गाडीला २२ डबे असून १८०० प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येईल. या गाडीचा ताशी वेग १३० किलोमीटर असा असणार आहे.
  • वेगवान प्रवासासाठी गाडीला पुश-पुलसाठी मागे आणि पुढे इंजिन
  • दोन्ही इंजिन कायमस्वरूपी गाडीलाच जोडलेली असणार
  • प्रत्येक डब्याची अंतर्गत रचना आकर्षक, नव्या मॉडेलची एलइडी लाईट्स, फॅन, स्विच – प्रत्येक सीटजवळ मोबाइल चार्जिंग पॉईंट
  • डब्यात सामान्य प्रवाशांबरोबरच दिव्यांगांसाठी स्वतंत्र शौचालय
  • डबे कायमस्वरूपी कपलिंगच्या माध्यमातून जोडले असल्याने प्रवासादरम्यान धक्के जाणवणार नाहीत.

(हेही वाचा : DRS Controversy : तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर जो रुट नाराज, डीआरएसवरून पुन्हा वाद )

या गाडीमध्ये पण वंदे भारत प्रमाणेच अनेक नवीन आणि अद्यावत सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहेत. या गाडीला खास असा भगवा आणि करडा रंग देण्यात आलेला आहे. सध्या तरी ही गाडी मुंबईमध्ये कसारा घाटात वेगवेगळे परीक्षण करण्यासाठी आणण्यात आलेली आहे. या परिसरांमध्ये ही गाडी पास झाली की ताबडतोब महत्त्वाच्या शहरांमध्ये ही गाडी चालवण्यात येण्याची घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. मुंबईमधून ही गाडी मुंबई ते दिल्ली आणि मुंबई ते पटना त्या दोन मार्गांवर चालवण्याची दाट शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.