मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) शनिवार, २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मोर्चा 26 जानेवारी रोजी मुंबईत पोहोचणार आहे.
(हेही वाचा – Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाइव्ह प्रसारण मोबाईल, टीव्हीवर कसे पहाल; वाचा सविस्तर)
20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून निघणार
मराठा समाजाच्या लोकांना सरसकट आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा सहकाऱ्यांसह 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून (Antarwali Sarathi) निघणार आहोत. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्ही शिवाजी पार्क (shivaji park) किंवा आझाद मैदानावर (azad maidan) आमरण उपोषणाला सुरुवात करणार, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पहिला मुक्काम 20 जानेवारी रोजी शिरूर(बीड) तालुक्यातील मातोरी डोंगर पट्ट्यात, दुसरा मुक्काम 21 जानेवारी रोजी नगर जिल्ह्यातील करंजी घाट, बारा बाभळी, तिसरा मुक्काम 22 जानेवारी रोजी रांजणगाव येथे असणार आहे.
पुण्यातील खराडी बाय पास, लोणावळा, वाशी असे मुक्काम घेऊन 26 जानेवारी रोजी 7 वाजता मुंबईतील आझाद मैदान आंदोलनस्थळी मोर्चा धडकणार आहे.
व्हॅनिटी व्हॅनमध्ये सोफा, आरसा, छोटा फ्रिज, ओव्हन, एसी
या मोर्चामध्ये मनोज जरांगे यांच्यासाठी व्हॅनिटी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी व्हॅनिटी व्हॅनची सोय केली आहे. आता ही व्हॅन बीडमध्ये दाखल झाली असून मुंबईपर्यंत ती मनोज जरांगे यांच्यासाठी मोर्चात असणार आहे. गेल्या पाच महिन्यांपासून आंदोलनात असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत चांगली रहावी, यासाठी ही सोय करण्यात आलाचे गंगाधर काळकुटे यांनी माध्यमांना सांगितले. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये सोफा, आरसा, छोटा फ्रिज, ओव्हन, एसी अशा सुविधा असणार आहेत.
यापूर्वीच्या दौऱ्यांतही जेसीबीतून पुष्पवृष्टी झाल्यामुळे जरांगे यांच्या पाठीशी कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community