वारकऱ्यांना मास्क वापरण्याचे आवाहन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

99

राज्यातील वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना मास्क वापरण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्यात मास्कसक्ती नसली तरीही भाविकांनी, वारकऱ्यांनी मास्क घालावा अन्यथा वारीमुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होण्याची भीती व्यक्त होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाविकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

( हेही वाचा : कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश! १०० टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता   )

वारकऱ्यांना मास्क वापरण्याचे आवाहन

राज्यात आता दरदिवसाला पाच हजारांच्या घरात रुग्णसंख्या वाढत असताना आता विठूरायाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने वारीमध्ये भाविकांचा, वारकऱ्यांचा सहभाग नोंदवला जात आहे. राज्यात मुंबईसह ठाणे, पुणे, पालघर आणि रायगडमध्येही कोरोनाची संख्या दरदिवसाला वाढत आहे. राज्यात सध्या २५ हजार ३१७ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबई शहरांत वाढत्या कोरोनाची संख्या लक्षात घेत आता आता लोकलमध्येही प्रवासादरम्यान मास्क सक्तीची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्याबाबत अधिकृतरित्या दुजोरा मिळालेला नाही. वारीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची संभाव्यता लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा पोलिस आयुक्त यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. परिस्थितीची कल्पना घेत मास्क घालण्याचे आवाहन करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.