वसईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमाअंतर्गत रुग्णालयांना आधुनिक मशीन देण्यात आली आहेत. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भाबोळा, वसई येथील सर डी एम पेटिट रुग्णालय (DM Petit Hospital) या शासकीय रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन (oxygen concentrator machine) देण्यात आले.
(हेही वाचा – Assembly Elections : मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी राजकीय पक्षांचेही सहकार्य अपेक्षित)
या मशीनमुळे श्वासाचे विकार असलेल्या व्यक्तींना फायदा होणार आहे. रुग्णाची ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी या मशीनचा उपयोग केला जातो.
गणेशोत्सव मंडळाने दिलेले मशीन उपस्थित डॉक्टरांनी स्वीकारून मंडळाचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष निलेश भानूशे, योगेश भानूशे, कुणाल कोदे, राहुल पाटील, जयेश राऊत, रितिक शिंदे, कौस्तुभ राऊत, राजेश चुरी, राजन कनोजिया, दिनेश गुप्ता, जयेश सोलंकी, निखिल हाटे, अभिषेक नार्वेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community