हर घर सावरकर समिती आणि महाराष्ट्र शासन यांच्यावतीने गणेशोत्सव स्पर्धा 2023 आयोजित करण्यात आली. त्यामध्ये कोकणप्रांतातील ‘वसईचा राजा’ गणेशोत्सव मंडळाला प्रथम पारितोषिक देण्यात आले.
मंडळाने गणेशोत्सवासमोरील सजावटमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या जीवनातील प्रसंग, त्यांनी केलेले कार्य, त्यांनी कठीण प्रसंगांमध्ये दाखवलेले धैर्य इत्यादी मूर्त रूपात सादर करण्यात आले होते. त्यामुळे मंडळाला या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक पुणे येथे झालेल्या कार्यक्रम सोहळ्यात देण्यात आले. एक लाख रुपयांचा धनादेश, मानपत्र व ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी स्वातंत्रवीर सावरकर (Veer Savarkar) यांचे नातू सात्यकी सावरकर, सावरकर अभ्यासक, लेखक चंद्रशेखर साने, प्रसिद्ध अभिनेता, लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा पुरस्कार स्वीकारताना मंडळाचे अध्यक्ष निलेश भानुशे, सचिव राहुल भांडारकर, कार्याध्यक्ष योगेश भानुशे, मयंक ठक्कर, जिग्नेश जगताप आदी उपस्थित होते.
(हेही वाचा Pune : पुण्यात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी अनोखा प्रयोग; कसा फायदा होणार?)
Join Our WhatsApp Community