Vasai Murder Case : पीडितेला कोणतीही मदत न करणाऱ्या बघ्यांवर कारवाई व्हावी का ? काय म्हणतात पोलीस अधिकारी…

222
Vasai Murder Case : पीडितेला कोणतीही मदत न करणाऱ्या बघ्यांवर कारवाई व्हावी का ? काय म्हणतात पोलीस अधिकारी...
Vasai Murder Case : पीडितेला कोणतीही मदत न करणाऱ्या बघ्यांवर कारवाई व्हावी का ? काय म्हणतात पोलीस अधिकारी...

वसई येथे १८ जून या दिवशी भर रस्त्यात एक युवतीची निर्घृण हत्या करण्यात आली. (Vasai Murder Case) या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तेथील बघ्यांच्या गर्दीविषयी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. या बघ्यांवरच पहिले गुन्हे नोंद करायला हवेत, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अशा भीषण घटना घडत असतांना खरेच बघ्यांनी काय करायला हवे, काही न करता केवळ फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्यांवर काही कारवाई होईल का, याविषयी आम्ही एका पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनीही अशा घटनांमध्ये नागरिकांनी जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले.

(हेही वाचा – Vidhan Parishad Election : विधानसभेआधी विधान परिषद निवडणुकीच्या जागांसाठी रस्सीखेच सुरू)

गर्दीत मित्र असेल तर…

पोलीस अधिकारी म्हणतात, बघ्यांवर गुन्हे नोंद करण्याची कोणतीही तरतूद नाही. मात्र त्या गर्दीत कोणी त्याचा मित्र असेल, त्याच्या बाईकवरून आलेला असेल, तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये अटकही होऊ शकते. त्याने हत्येसारखा मोठा गुन्हा करतांनाही मित्राला वाचवले नाही; म्हणून कारवाई होऊ शकते.

नागरिकांनी जबाबदारीने वागावे

अशा घटना घडतात, तेव्हा मदतीसाठी कोणीही पुढे येत नाही. ही सामाजिक समस्या आहे. समोर घडत आहे, ती वेळ कधीतरी आपल्यावरही येऊ शकते, हे लक्षात घेऊन नागरिकांनी जबाबदारीने वागावे. बघ्यांमध्ये कोणी पोलिसांना स्टेटमेंट द्यायलाही येत नाही. त्यासाठी पोलिसांना प्रत्यक्षदर्शींच्या पुष्कळच मागे लागावे लागते. त्यामुळे पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया यांना उशीरही होतो.

पोलीस तपासातही अडचणी

आपण पोलिसांना स्टेटमेंट दिले की, उगाचच काहीतरी आपल्या मागे लागेल, अशी धारणा आहे. त्यामुळे घरचेही दबाव आणतात, मला माहीत नाही, मला आठवत नाही, असे सांग म्हणून. त्यामुळे पोलीस तपासातही अडचणी येतात. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. (Vasai Murder Case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.