Vasai Murder Case : युवतींनो, स्वरक्षण प्रशिक्षण घ्या; Hindu Janajagruti Samiti च्या रणरागिणी शाखेचे आवाहन

Vasai Murder Case : वसई येथे एका युवतीची भर रस्त्यात हत्या झाल्याची धक्कादायक घटना १८ जून रोजी घडली आहे. त्या पार्श्वभूमीवर रणरागिणी शाखेने हिंदु युवतींना स्वरक्षण प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले आहे.

113
Vasai Murder Case : युवतींनो, स्वरक्षण प्रशिक्षण घ्या; Hindu Janajagruti Samiti च्या रणरागिणी शाखेचे आवाहन
Vasai Murder Case : युवतींनो, स्वरक्षण प्रशिक्षण घ्या; Hindu Janajagruti Samiti च्या रणरागिणी शाखेचे आवाहन

वसई (Vasai Murder Case) येथे युवतीच्या झालेल्या दुर्दैवी हत्येनंतर दिसून येते की, सध्या हिंदू महिलेचे जीवन असुरक्षित झाले आहे. अशा प्रसंगांना सामोरे जाता येण्यासाठी हिंदू महिलांनी स्वरक्षणासाठी सक्षम होणे आवश्यक आहे. वसई येथील घटनेचे व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येते की, ती प्रतिकार करू शकली असती, तर कदाचित तिचा जीव वाचला असता. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदू युवतींसाठी स्वरक्षण प्रशिक्षण (Self Defense) वर्ग घेतले जातात. सध्याचे असुरक्षित वातावरण पहाता सर्व हिंदू युवतींनी या स्वरक्षण प्रशिक्षण वर्गात सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या (Hindu Janajagruti Samiti) रणरागिणी शाखेच्या सौ. जान्हवी भदिर्के यांनी केले आहे.

(हेही वाचा – Vasai Murder Case : घटना माणुसकीला काळीमा फासणारी; महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दिले कठोर कारवाईचे निर्देश)

मन खंबीर ठेवून प्रतिकार करता येणे महत्त्वाचे

जान्हवी भदिर्के पुढे म्हणाल्या की, या घटनेत बघ्यांची गर्दी असूनही कोणीही त्या युवतीला वाचवण्यासाठी पुढे आले नाही. अशा प्रसंगी मन खंबीर ठेवून प्रतिकार करता येणे, हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळेच केवळ युवतीच नाही, तर महिला-पुरुष अशा सर्वांनीच स्वतःचे आणि इतरांचे रक्षण करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे. त्याने शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढते. त्यामुळे आताच्या कठीण काळात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या प्रशिक्षण वर्गात सहभागी व्हावे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.