Vasai Murder Case : घटना माणुसकीला काळीमा फासणारी; महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दिले कठोर कारवाईचे निर्देश

Vasai Murder Case : राज्य महिला आयोगाच्या वतीने तातडीने पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयराम रणावरे यांच्याशी मी फोनवरून संपर्क करून सूचना दिल्या आहेत, असे रूपाली चाकणकर म्हणाल्या.

137
Vasai Murder Case : घटना माणुसकीला काळीमा फासणारी; महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दिले कठोर कारवाईचे निर्देश
Vasai Murder Case : घटना माणुसकीला काळीमा फासणारी; महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दिले कठोर कारवाईचे निर्देश

वसईमध्ये भररस्त्यात तरुणाने मुलीवर वार करत तिची हत्या केली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे.या प्रकरणामध्ये कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने तातडीने पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयराम रणावरे यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधत यामध्ये कलम त्याचबरोबर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिलेले आहेत, असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Commission for Women) अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी म्हटले आहे. (Vasai Murder Case)

(हेही वाचा – Thakur Village Kandivali East : कांदिवली पूर्व येथे वसलेले राहण्यासाठी परिपूर्ण ठिकाण म्हणजे ठाकूर व्हिलेज)

वसई येथे भर रस्त्यात युवतीची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. या विषयी रूपाली चाकणकर यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनीही या घटनेविषयी खेद व्यक्त केला.

कोणीही मदतीला न येणे चिंताजनक 

महिला आयोगाच्या अध्यक्षा (Rupali Chakankar) पुढे म्हणाल्या की, या सगळ्या घटनेमध्ये पुरावे सादर करत असताना ठोस दोषाआरोप पत्र देखील सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. खरे तर अशा घटना घडत असताना मुलांमध्ये हिंसक वृत्ती निर्माण होऊन व हत्येपर्यंत मजल जाणं त्याहूनही बघ्यांमध्ये नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना कोणीही मदतीला न येणे हे फारच चिंताजनक आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने आरोपीवर पुढील कडक कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल. (Vasai Murder Case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.