वसई (Vasai Road), विरार, नालासोपारा, नायगाव, मीरा-भाईंदर ही महापालिका क्षेत्रे झपाट्याने विस्तारत आहेत. देशाच्या विविध भागांतून मुंबईत येणारे नागरिक मोठ्या संख्येने या भागात राहतात. संपूर्ण वर्षभर या भागातील प्रवासी विविध सण, उत्सव, लग्न समारंभ, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. या प्रवाशांनी लांब पल्ल्याच्या रेल्वेसाठी सीएसएमटी, एलटीटी, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस गाठावे लागते. त्यासाठी लोकलमधील गर्दीमुळे एक ते दोन तास उभ्याने प्रवास करावा लागतो. (Vasai Road Railway Terminal)
(हेही वाचा – PM Modi to Aussie PM : ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या आदरातिथ्यावर पंतप्रधान मोदींनी मानले त्यांचे आभार)
कोकण, दक्षिण आणि उत्तर भारतासाठी नाही थेट गाडी
वसई रोड स्थानकातून भारताच्या उत्तर आणि दक्षिण भागासाठी सुपर फास्ट, राजधानी आणि दुरांतो इत्यादी एक्स्प्रेस धावतात. तथापि, स्थानकावरून कोकणासह दक्षिण भारत आणि उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, दिल्ली, हरियाणासाठी थेट गाडी नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी वसई रोड रेल्वे स्थानक टर्मिनस बनवण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी याबाबत नुकतीच घोषणा केली.
हेमंत सावरा यांच्या मागणीला उत्तर
वसई रोड (Vasai Road) स्थानकात टर्मिनस बनवावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती.त्यासाठी रेल्वे टर्मिनससाठी वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने पालघरचे खासदार हेमंत सावरा यांच्याकडे केली होती. त्यांच्यामार्फत रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर मंत्रीमंडळाने या टर्मिनसला मान्यता दिली आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरील (Western Railway) इतर टर्मिनसवरील ताणही कमी होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community